एक्स्प्लोर

हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे

मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थानिकांनी आपली साम्राज्ये स्वतंत्र भारतात विलीन केली. मात्र, दक्षिणेतील हैदराबाद संस्थान विलीनीकरणास तयार नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळूनही 13 महिने येथील जनतेला गुलामीचे जीवन जगावे लागत होते. यामुळे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 17 सप्टेंबर रोजी सैनिकी कारवाईने हे संस्थान विलीन करून येथील जनतेला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. आज या घटनेला 68 वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशांनी येथील संस्थानिकच्या मार्फत चालणारा राज्यकारभाराचा फायदा उचलत विविध राजवटींमधील संघर्ष, स्वतःच्या फायद्यासाठी चातुर्याने वापरून घेतला. यासाठी कधी राजांशी तह करून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 600 पेक्षा अधिक छोटी-मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती. या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासनासंदर्भात मर्यादित स्वायत्तता होती, मात्र सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वांत मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते. 13 महिन्याचा कडवा संघर्ष निजामाचे हैदराबाद संस्थान सध्याच्या तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक आणि विदर्भाचा काही भागापर्यंत विस्तारलं होतं. 1724 ते 1948 पर्यंत यावर निजामाचा एकछत्री अंमल होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा या संस्थानातील जनतेलाही इतर संस्थांनाप्रमाणे स्वतंत्र भारतात विलीन व्हायचं होते. मात्र, निजामाची त्याला तयारी नव्हती. यातूनच एक मोठा संघर्ष सुरु झाला. विविध राजकीय गट, समाजसुधारक हैदराबाद संस्थानच्या विलीनिकरणासाठी प्रयत्नशील होते. यात  डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, मुल्ला अब्दुल कयुम, रामचंद्र पिल्लई, मौलिम ए शफिक पत्राचे संपादक मोहिब हुसेन, हाजार दास्तानचे संपादक सय्यद अखिल, लोकमान्या टिळकांचे अनुयायी शिवराम शास्त्री गोरे यांचा पुढाकार होता. पण निजामाचे 'रजाकारी' सैन्य हा संघर्ष बळाचा वापर करून मोडून काढत होते. लोहपुरुष सरदार पटेल अखेर यावर शेवटचा उपाय म्हणून तत्कालिन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सैनिकी कारवाईचा वापर करत, निजामाला त्याचे संस्थान भारतात विलीन करण्यास भाग पाडले. त्यांच्या या मुत्सद्देगिरी व सैन्यबळ वापरून संस्थाने भारतात विलीन करून घेण्याच्या निर्णयक्षमतेमुळेच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जाऊ लागले. सैनिकांच्या या कारवाईची इतिहासामध्ये 'ऑपरेशन पोलो' म्हणून नोंद आहे. देशाला ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून मुक्ती मिळाली तरी हैदराबादमधील जनतेचा 13 महिने स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरुच होता. आज हैदराबादची जनता हा दिवस एकप्रकारे स्वातंत्र्य दिन म्हणूनच साजरा करते.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget