Omicron variant : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 रुग्णांची नोंद
देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
![Omicron variant : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 रुग्णांची नोंद 6,041 cases of Omicron variant of coronavirus detected in India so far says Union Health Ministry Omicron variant : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/f8dd206989a341d1d0ee575f6ebc29da_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron variant : देशात दिवसेंदिवस कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच आता ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कालपर्यंत देशातील एकूण ओमायक्रॉन बाधितांचा आकडा हा 5 हजार 753 होता. आज त्यामध्ये भर पडली आहे. आज 288 नवीन ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे.
6,041 cases of Omicron variant of coronavirus detected in India so far: Union Health Ministry
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2022
एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. देशातील जवळपास 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 402 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 16.66 टक्के आहे. जो काल 14.78 टक्के होता. म्हणजे दैनंदीन पॉझिटीव्हीटी रेटमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल देशात कोरोनाच्या 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये 4 हजार 631 रुग्णांची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 14 लाख 17 हजार 820 झाली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 लाख 85 हजार 752 लोकांनी आपला जीव गमावला आहे. काल दिवसभरात 1 लाख 22 हजार 622 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 49 लाख 47 हजार 390 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. काल देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी होती. आज त्यामध्ये वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)