एक्स्प्लोर
तारखा जाहीर, 5 राज्यांचा निकाल 11 मार्चला
नवी दिल्ली : देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरसाठी निवडणुका होत आहेत.
गोवा विधानसभा मतदानाने सुरुवात तर उत्तर प्रदेशातील मतदानाने पाच राज्यांच्या निवडणुकीचा शेवट होईल. 4 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान मतदान, तर सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल.
गोवा, पंजाब आणि उत्तरखंडमध्ये एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक 7 टप्प्यात मतदान होणार आहे.
कोणत्या राज्यात मतदान कधी?
गोवा विधानसभा निवडणूक (40) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
पंजाब विधानसभा निवडणूक (117) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
www.abpmajha.in
उत्तराखंड विधानसभा निवडणूक (71): 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (403) : 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
LIVE UPDATE
राज्यनिहाय विधानसभा सद्धस्थिती
उत्तरप्रदेश - 403
- यूपी, पंजाब, उत्तराखंड- उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा - 28 लाख, तर गोवा आणि मणिपूर 20 लाख
- उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक - निवडणूक आयोग
- 5 राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक, सुमारे 16 कोटी मतदार
- पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार
- पाच राज्यात एकूण 690 विधानसभा जागांवर निवडणूक
- प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पिकर वापरता येणार नाही
- काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार
- निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी
- उमेदवारावर पाणी, वीज किंवा कोणत्याही बिलाची थकबाकी नको
- गोवा - 4 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
- पंजाब - 4 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
- उत्तराखंड - 15 फेब्रुवारी मतदान - एकाच टप्प्यात
- मणिपूर - 4 मार्च -पहिला टप्पा (38 जागा)
- मणिपूर - 8 मार्च मतदान - दुसरा टप्पा (22)
- उत्तराखंड - 7 टप्प्यात मतदान
- पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी मतदान
- दुसरा टप्पा 11 जिल्हे 67 जागा- 15 फेब्रुवारी मतदान (उत्तराखंडच्या बॉर्डरला लागून असलेले जिल्हे)
- तिसरा टप्पा - 69 विधानसभा - 12 जिल्हे - मतदान - 19 फेब्रुवारी
- चौथा टप्पा - 63 विधानसभा - 12 जिल्हे - मतदान - 23 फेब्रुवारी
- पाचवा टप्पा - 52 विधानसभा - 11 जिल्हे - मतदान 27 फेब्रुवारी
- सहावा टप्पा - 49 विधानसभा 7 जिल्हे - मतदान 4 मार्च
- सातवा टप्पा - 40 विधानसभा - 7 जिल्हे - मतदान 8 मार्च
पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती
राज्य | एकूण जागा | मुख्यमंत्री | सत्ताधारी | विरोधी पक्ष |
उत्तर प्रदेश | 403 | अखिलेश यादव | समाजवादी पार्टी (229) | बहुजन समाजवादी पार्टी (80) |
पंजाब | 117 | प्रकाशसिंह बादल (अकाली दल) | शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) | काँग्रेस 48 |
उत्तराखंड | 71 | हरीश रावत (काँग्रेस) | काँग्रेस+बसपा+उत्तराखंड क्रांती दल | भाजप (27) |
मणिपूर | 60 | ओकराम इबोबीसिंग | काँग्रेस (50) | नागा पिपल्स फ्रंट (4) |
गोवा | 40 | लक्ष्मीकांत पार्सेकर | भाजप (21) | काँग्रेस (7) |
- सत्ताधारी - समाजावादी पार्टी 229
- मुख्यमंत्री अखिलेश यादव
- बहुजन समाजवादी पार्टी- मायावती - 80
- भाजप - 40
- काँग्रेस- 28
- राष्ट्रीय लोक दल (अजित सिंह)- 8
- पीपी - 4
- कौमी एकता दल - 02
- तृणमूल काँग्रेस 1
- इत्तेहाद ए मिल्लत - 1
- राष्ट्रवादी काँग्रेस -1
- अपक्ष - 6
- राज्यपाल नियुक्त - 1
- सत्ताधारी - शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) - 65
- मुख्यमंत्री - प्रकाशसिंह बादल
- विरोधी पक्ष - काँग्रेस 48
- अपक्ष - 04
- सत्ताधारी -काँग्रेस (26) + बसपा (2)+ उत्तराखंड क्रांती दल 1 = 29
- विरोधी पक्ष - भाजप 27
- अपक्ष - 03
- अपत्रा ठरवेले - काँग्रेस 10 + भाजप 1
- मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पारसेकर
- विरोधी पक्ष : काँग्रेस 07
- भाजप - 21
- काँग्रेस- 07
- महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
- गोवा विकास पक्ष-02
- अपक्ष -05
- रिकाम्या -02
- मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंह
- विरोधी पक्ष : नागा पीपल्स फ्रण्ट 04
- काँग्रेस -50
- भाजप -01
- नागा पीपल्स फ्रण्ट (एनपीएफ) 04
- रिकाम्या -05
- एकूण60
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement