एक्स्प्लोर
गोव्यात साकारलाय तब्बल 40 फुटी आकाश कंदील
गोव्यात राजधानी पणजी मधील मळा भागात यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे. आता तो सगळयाच्याच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पणजी: दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव, पणत्या आणि आकाश कंदील पेटवून पारंपरिक दीपावली साजरी केली जाते. आपल्या घरात साधारणत: एक ते दोन फूटाचे आकाश कंदील लावून दीपावली साजरी करतो. पण गोव्यात एका मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील साकारला आहे. असून आज तो सगळयाच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. गोव्यात राजधानी पणजी मधील मळा भागात यूथ ऑफ पोर्ताइज मंडळाने तब्बल 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे. आता तो सगळयाच्याच आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तब्बल 15 दिवस मंडळाचे कार्यकर्ते हा आकाश कंदील बनवत होते. दरवर्षी अशाच प्रकारचा भला मोठा आकाश कंदील बनवून मंडळातर्फे दीपावली साजरी केली जाते. त्याला मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. यंदा तर मंडळाने एक लाख खर्च करुन हा 40 फूटी आकाश कंदील बनवला आहे. यासाठी अनेकांनी देणगीसुद्दा दिली आहे. गोव्यात दीपावलीला भले मोठे नरकासूर बनववून त्याचे दहन करण्याची परंपरा आहे. गावा-गावात सध्या तरुण मंडळी अवाढव्य आणि आक्राळ विक्राळ नरकासुर बनवण्यात दंग असतात. मात्र या मंडळाने वेगळी वाट चोखाळत 40 फूटी आकाश कंदील साकारला आहे. विशेष म्हणजे हा आकाश कंदील एका चर्च समोर उभारण्यात आला आहे. सर्वधर्मीय लोक त्यात सहभागी होत असल्याने त्यातून राष्ट्रीय एकात्मता देखील वाढीस लागत आहे.
आणखी वाचा























