एक्स्प्लोर
Advertisement
मोदींच्या ‘या’ योगा व्हिडीओसाठी 35 लाखांचा खर्च ?
माहिती आणि दूरसंचार राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी नरेंद्र मोदींना फिटनेस चँलेज दिले होते. हे चॅलेंज स्वीकारत पंतप्रधान मोदींनी विविध योगासने करत त्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन शेअर केलेला ‘योगा’चा व्हिडीओ बनवण्यासाठी सरकारने तब्बल 35 लाखांचा चुराडा केला, असा आरोप काँग्रस नेते शशी थरुर यांनी केला आहे.
माहिती आणि दूरसंचार राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी नरेंद्र मोदींना फिटनेस चँलेज दिले होते. हे चॅलेंज स्वीकारत पंतप्रधान मोदींनी विविध योगासने करत त्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओची देशभरात मोठी चर्चाही झाली होती.
शशी थरुर यांनी मात्र आता या व्हिडीओवरुन सरकारला लक्ष्य केले आहे. ट्विटरवर एक आर्टिकल शेअर करत थरुर यांनी म्हटलं की, “योगदिनाच्या जाहिरातीसाठी सरकारकडून 20 कोटी आणि पंतप्रधानाच्या योगा व्हिडीओसाठी 35 लाख खर्च होणं लज्जास्पद आहे.”
शशी थरुर यांच्या आरोपाला राज्यवर्धन राठोड यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांचा योगाचा व्हिडीओ बनवण्यासाठी एक रुपयाही खर्च केला नसून हा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाच्या व्हिडीओग्राफरने चित्रित केला आहे, अशा आशयाचं ट्वीट राज्यवर्धन राठोड यांनी केलं आहे.20 crore rupees in ads for #YogaDay, 35 lambs for @PMOIndia's fitness video! Disgraceful. This government is all about smoke & mirrors. Hype is their substitute for hope -- the hopes they have destroyed.https://t.co/vmYZINkRD2
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 2, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ :Not surprised Mr @ShashiTharoor, falsehoods is ur substitute 4 facts
No money ws spent 4 PM’s fitness vid. It ws recorded by PMO videographer. This article is based on 'solid proof' of hearsay And I assure you sir,not a single 'lamb' was sacrificed for the vid, let alone 35! ???? https://t.co/xiC52ak7iw — Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) July 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement