एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनी घातपातासाठी तीन संशयित दिल्लीत दाखल, हायअलर्ट जारी
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात तीन संशयित लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली आहे.
नवी दिल्ली : 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात तीन संशयित लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली आहे.
गुप्तचर खात्यानं एका सांकेतिक कॉलच्या आधारे हा अलर्ट जारी केला आहे. कॉलमध्ये तीन संशयित जामा मशीद परिसरात लपले असून ते 26 जानेवारीला मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याचं आढळून आलं. जामा मशीद परिसरात लपलेले तिघेही अफगाणिस्तानचे असल्याचंही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानमध्ये या तिघांचंही ट्रेनिंग झालं असून काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना सूचना दिल्या जात आहेत.
गुप्तचर यंत्रणा सतत या तिघांवर लक्ष ठेवून आहे. हे तिघेही पस्तो भाषेत संभाषण करत असल्याचं उघड झालं आहे. गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर विशेष बैठक घेण्यात आली. दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही यावर लक्ष ठेवून आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement