Monsoon : मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा पूर्वानुमान आज जाहीर करणार, भारतीय हवामान खात्याची माहिती
नैऋत्य मान्सूनच्या (Southwest Monsoon) दुसऱ्या टप्प्याचा पूर्वानुमान आज दुपारी 12 वाजता एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केरळमध्ये होणारं नैऋत्य मान्सूनचं आगमन दोन दिवसांनी लांबलं असून यंदाचा मान्सून दोन दिवस उशिरा म्हणजे 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होत आहे. आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वानुमानासंबंधी महत्वाची माहिती आज दुपारी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात येणार आहे. या संबंधी आज दुपारी 12 ते 12.30 या वेळेच्या दरम्यान भारतीय हवामान खात्याची एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. ही परिषद व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे.
2nd Stage LRF of Southwest Monsoon 2021:Virtual Press Conference on 1 June 2021(1200-1230 hrs IST)
— India Meteorological Department (@Indiametdept) May 31, 2021
Link for the meeting:https://t.co/sLYkXP3OQ0
For agenda of the date pls visit https://t.co/GOiOHierCb@rajeevan61 @PIB_India @DDNational @DDNewslive pic.twitter.com/sQObi7uB5h
या आधी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचं आगमन होणार आहे. कोकणात मान्सून 10 जूनला तर मुंबईत 12 जूनपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या केरळमध्ये आंबेसरी कोसळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर पावसाळा सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली होती. जवळपास निम्म्या शेतजमिनीत सिंचन नाही आणि तांदूळ, कॉर्न, ऊस, कापूस आणि सोयाबीनची पिके घेण्यासाठी जून ते सप्टेंबरच्या वार्षिक पावसावर अवलंबून असतो. या पिकांसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे ठरते.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus : पालघरमध्ये नवजात मुलीला कोरोनाची लागण; जव्हार रुग्णालयात दाखल
- Lockdown in Solapur city : शासकीय नियमाचा सोलापूर शहराला फटका; कोरोना स्थिती आटोक्यात, तरी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता नाही
- Crime News : हर्बल पावडर आणि कच्चे वैद्यकीय साहित्याच्या ऑनलाईन विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; टोळी गजाआड