एक्स्प्लोर

2G स्पेक्ट्रमचा निकाल देणारे न्यायमूर्ती ओ.पी सैनी कोण आहेत?

सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी देशातील सर्वात गाजलेल्या आणि मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणाचं न्यायदान केलं.

नवी दिल्ली : देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी देशातील सर्वात गाजलेल्या आणि मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणाचं न्यायदान केलं. ओ.पी सैनी कोण आहेत? टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील हायप्रोफाईल आरोपींची सुटका करणारे सीबीआयचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सैनी यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाच्या प्रकरणांवर काम करत अनेकांना तुरुगांत धाडलंय. 63 वर्षांच्या सैनी यांचं नाव न्यायव्यवस्थेमध्ये अतियश आदराने घेतलं जातं. अभ्यासू , मृदभाषी म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मूळचे हरियाणाचे असलेले सैनी 1981 मध्ये दिल्लीत आले आणि पोलिस सब इन्स्पेक्टर झाले. पोलिस दलातील 6 वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी न्यायिक व्यवस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. 1987 मध्ये मॅजिस्ट्रेटची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एकमेव विद्यार्थी होते. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टूजी घोटाळ्यासाठी विशेष न्यायालय नेमण्याचे आदेश दिले, तेव्हा सैनी यांचं नाव एकमताने सरकारला सुचवण्यात आलं. टूजी घोटाळ्याआधीही सैनी यांनी अनेक बड्या धेंड्यांना दणका दिलाय. राष्ट्रकुल घोटाळ्यात सुरेश कलमाडींचे निकटवर्तीय ललितकुमार भानोत, व्ही.के वर्मा, कुक रेड्डी, प्रवीण बक्षी यांच्यासारख्या दिग्गजांना सैनी यांनी घरचा रस्ता दाखवला. नॅशनल अॅल्युमिलीअम कंपनी म्हणजेच नेल्को लाच प्रकरणातही तत्कालिन चेअरमन ए. के. श्रीवास्तव यांचा जामीन  नाकारला. टूजी घोटाळ्यातही कनिमोळीचा जामीन त्यांनी अनेकदा नाकारला होता. आणखी एका प्रकरणात भारती एअरटेलचे सुनिल मित्तल आणि हचिसन मॅक्सचे असीम घोष यांनाही साक्षीसाठी पाचारण करण्यात आलं. लाल किल्याजवळील पोलीस चौकीवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना आजन्म कारावास सुनावला. जनतेच्या घामाच्या पैशांचा मलिदा लाटणाऱ्या अनेकांना ओ.पी सैनी यांनी जन्माची अद्दल घडवली आहे. त्यामुळे टू जी घोटाळ्यावर सैनी यांनी दिलेल्या निकालावर शंका व्यक्त करायला कुणालाही सध्यातरी जागा नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Commissioner Amitesh Kumar PC : नराधम दत्ता गाडे कसा सापडला? पुणे पोलिसांची UNCUT PCABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 28 February 2025Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखलABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 28 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना VVIP ट्रीटमेंट? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया; म्हणाले, जेल प्रशासनाने आता तरी...  
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
उद्धव ठाकरेच गद्दारीचे जनक, त्यांचा ढोंगीपणा उघड, मंत्री आशिष शेलारांचा हल्लाबोल 
Dattatray Gade Arrested : इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
इथलं पाप इथंच फेडायचं, दत्ता गाडेचा तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेताना दोरी तुटली, कीटकनाशकही शोधलं!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Video : अत्याचार पीडिता केस करण्यासाठी गेली, पोलिस अधिकारी म्हणतो 30 हजार दे मग केस घेतो, मग लाचलूचपतने पकडलं, गाडीत दाबून कोंबताच म्हणाला पैसे परत देतो की!
Heatwave In March : मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
मार्चमध्ये भीषण गर्मीचा इशारा, तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता; काल दिल्लीत 74 वर्षांतील सर्वात उष्ण रात्र, हिमाचल-जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Ajit Pawar : स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या; पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
विद्यापीठातील दोन समलैंगिक विद्यार्थी भाड्याच्या खोलीत नागरिकांना रंगेहाथ सापडले; तीन महिन्यांपासून जेलमध्ये, आता इस्लामिक कायद्यांतर्गत दोघांना...
Embed widget