ओबीसींसाठी केंद्राचा मोठा निर्णय, सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण
पुढील वर्षापासून सैनिक शाळांमध्ये 27% ओबीसी कोटा (Sainik schools to implement 27% OBC quota) लागू करणार आहेत.संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत घोषणा केली. देशातील 31 सैनिक शाळांमध्ये हा निर्णय लागू होणार आहे.
![ओबीसींसाठी केंद्राचा मोठा निर्णय, सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण 27 per cent seats in Sainik schools will be reserved for other backward classes Defence Secretary Ajay Kumar says ओबीसींसाठी केंद्राचा मोठा निर्णय, सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/31140740/sainik-school-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : 2021-22 शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. आर्मी ही एकमेव संस्था आहे जिथे आरक्षण लागू नाही. सैनिक स्कूलमध्ये 27 टक्के राखीव याचा अर्थ भावी अधिकार्यांसाठी अप्रत्यक्ष आरक्षण लागू होत आहे. 10% आर्थिक आरक्षण जेव्हा केंद्रात आलं तेव्हा ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा होती. पण तेव्हाही लष्करानं स्पष्ट केलं होतं की ते लागू करणार नाही.
OBC reservation to be introduced in Sainik Schools from the year 2021-22.@SpokespersonMoD @adgpi @IAF_MCC @indiannavy @IndiaCoastGuard @DefPROMumbai @HQ_DG_NCC @mhrdschools @cbseindia29 @KSBSectt @SSPurulia @ssbj1963 pic.twitter.com/Kp9ugnBI16
— Ajay Kumar (@drajaykumar_ias) October 30, 2020
सध्या सैनिक शाळांमधल्या 67 टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित प्रदेशातील मुलांसाठी असतात तर 33 टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात. आता या दोन कॅटॅगरीमध्ये जनरल, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे. काल ज्यावेळी संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली होती त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये प्रचारात व्यस्त होते.
सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी 27 टक्के जागा या विद्यमान कोट्या व्यतिरिक्त असतील. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार आहेत. या कोट्यासंदर्भात सर्व शाळांच्या प्राचार्यांना 13 ऑक्टोबर रोजी आदेश देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या नव्या निर्णयामुळं संरक्षण क्षेत्रात काही लोकांनी टीका करत यामुळं जातीभेदाची बीजं पेरली जातील असं म्हटलं आहे तर काही अधिकाऱ्यांनी हे चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
आधी कसं होतं आरक्षण
पुढील वर्षापासून ओबीसींना सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल. आतापर्यंत 15 टक्के जागा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तर 7.5 टक्के जागा या एसटी प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. सोबतच 25 टक्के सीट्स या सैन्यदलाशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव असायच्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)