एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंकडून शरयू नदीची पूजा, 2100 दिव्यांनी उजळणार नदीचा काठ
सायंकाळी उद्धव यांच्या हस्ते शरयू नदीच्या किनारी पूजा केली जाणार आहे. या पूजेसाठी शरयू नदीच्या काठी तब्बल 2100 दिवे लावले जाणार आहेत.
अयोध्या : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येत दाखल झाले आहेत. आज सायंकाळी उद्धव यांच्या हस्ते शरयू नदीच्या किनारी पूजा केली जाणार आहे. या पूजेसाठी शरयू नदीच्या काठी तब्बल 2100 दिवे लावले जाणार आहेत.
उद्धव ठाकरे आज दुपारी अयोध्येत दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येला आले आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी लक्ष्मण किला येथे संत पूजन आणि आशीर्वाद उत्सव या कार्यक्रमात सहभाग घेतला.
शरयू नदीच्या किनारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर अयोध्येतल्या लक्ष्मण किला भागात आशीर्वादोत्सव हा कार्यक्रम होणार आहे. त्याठिकाणी राम मंदिर उभारणीसाठी अनेक वर्ष झटणाऱ्या देशभरातल्या साधूंचा सन्मान केला जाणार आहे.
ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्याला उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेही आहेत.
उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम
अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. 'लक्ष्मण किला'वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. 'लक्ष्मण किला'वरील कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 5.15 वाजता उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उद्धव ठाकरे राम जन्मभूमीत रामललांचं दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील.
शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जात आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली आहे. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वरही अयोध्येला गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement