एक्स्प्लोर

'आप'च्या 20 आमदारांचं सदस्यत्व अखेर रद्द!

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करुन, आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे.

नवी दिल्ली :  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवडणूक आयोगाची शिफारस मान्य केली आहे. आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांचं सदस्यत्त्व राष्ट्रपतींच्या मंजुरीने रद्द करण्यात आलं आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करुन, आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे. आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिकेद्वारे केली होती. यानंतर राष्ट्रपतींनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवलं होतं. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून आज अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी पाठवलेल्या याचिकेवर दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आपलं उत्तर देताना, या 20 ही आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे. दरम्यान, राष्ट्रपतींनी जरी आपचे 20 आमदार अपात्र ठरवले, तरीही केजरीवाल सरकारवर फरक पडणार नाही. कारण, दिल्लीत 70 पैकी तब्बल 66 आमदार आपचे आहेत. दिल्ली विधानसभेचं पक्षीय बलाबल एकूण जागा - 70 (बहुमताचा आकडा 36) आम आदमी पक्ष - 66 भाजप - 04 काँग्रेस -00 'निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार' "राष्ट्रपतींकडे प्रकरण गेल्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत," असं आम आदमी पक्षानं स्पष्ट केलं आहे. तसेच, आम आदमी पक्षाला काम करता येऊ नये, यासाठी भाजप सरकारनं ही खेळी खेळल्याचा आरोपही आपनं केला आहे. संबंधित बातम्या 'आप'ला धक्का बसणार, 20 आमदार अपात्र ठरणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 Pm : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget