एक्स्प्लोर
Advertisement
..तर, शिख दंगली झाल्या नसत्या; माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचा धक्कादायक गौप्यस्फोट
ऑपरेशन ब्लू स्टारनंतर 31 ऑक्टोबर 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर दिल्लीसह अनेक भागात शिख विरोधी दंगली उसळल्या. यात जवळपास तीन हजार लोकांना जीव गमवावा लागला होता.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 साली झालेल्या शिख दंगली संदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर, या दंगली रोखता आल्या असत्या, असा दावा मनमोहन सिंग यांनी केला आहे. शिख दंगलीवरुन नेहमीच काँग्रेसवर आरोप केले जातात. आता काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबद्दल वक्तव्य केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
सैन्याला पाचारण करण्याचा गुजराल यांनी दिला होता सल्ला - मनमोहन
इंद्र कुमार गुजराल यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात मनमोहन सिंग बोलत होते. "गुजराल यांनी गृहमंत्री नरसिंह राव यांना लवकरात लवकर सैन्याला पाचारण करण्याचा सल्ला दिला होता. इंद्र कुमार गुजराल त्यावेळी कोणत्याही पदावर नव्हते. मात्र, त्यांनी एका ज्येष्ठ नेत्याच्या नात्याने हा सल्ला दिला होता".
1984 मध्ये नेमके काय झाले होतं?
ऑपरेशन ब्लू स्टार नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकाकडूनच हत्या झाली. त्यानंतर 1984 मध्ये देशभर शिखांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. दिल्लीतील केट परिसरातील पालम वसाहतीमध्येही दंगल झाली. या दंगलीत सहा जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार, बलवान खोक्कर, महेंद्र यादव, गिरधारी लाल, किशन खोक्कर आणि कॅप्टन भागमल यांच्यावर आरोप होते. याप्रकरणी दिल्ली हायकर्टाने 2018 मध्ये काँग्रेस नेते सज्जन कुमारला जन्मठेपेची शुक्षा सुनावली आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत तीन हजारांपेक्षा अधिक लोक मारले गेले. या प्रकरणात 650 खटले दाखल करण्यात आले होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथही आले होते अडचणीत
शीख दंगलीवेळी एका गुरुद्वाराला लोकांनी लक्ष्य केलं होतं. त्याठिकाणी कमलनाथ उपस्थित असल्याचा दावा केला जातो. या प्रकरणात नानावटी आयोग आणि न्या. रंगनाथ मिश्रा यांच्या आयोगासमोर वरिष्ठ पत्रकार संजय सुरी यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे माहिती समजल्यावर मी तिथे गेलो होतो, असा दावा कमलनाथ यांनी केला होता. या गुरुद्वाराजवळ दोन शिखांना जिवंत जाळण्यात आले होते.
हेही वाचा -
Fact Check | दोन हजारांच्या नोटा बंद होणार? एक हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार?
सचखंड गुरुद्वाऱ्याची तख्तस्थानाची वैभवशाली परंपरा | नांदेड | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement