एक्स्प्लोर

Fact Check | दोन हजारांच्या नोटा बंद होणार? एक हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार?

काही दिवसांपूर्वी एका आरटीआयला उत्तर देताना रिझर्व बँक ऑफ इंडियाने सांगितलं होतं की, दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. परंतु बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केलेल्या नाहीत.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक मेसेज वायरल होत आहेत मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, नोटाबंदीनंतर बाजारात आलेली दोन हजार रुपयांची नोटही आता बंद झाली आहे. सरकार पुन्हा एकदा एक हजार रुपयांची नोट आणण्याची तयारी करत आहे. या मेसेजमध्ये सोशल मीडियात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाही उल्लेख आहे. जाणून घेऊया या वायरल मेसेजची सत्यता काय आहे? वायरल मेसेजमधील दावा काय आहे? वायरल मेसेजनुसार, रिझर्व बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2020 पासून एक हजारच्या नव्या नोटा बाजारात आणणार आहे. तर 2000 रुपयांच्या सर्व नोटा परत घेतल्या जाणार आहे. तुम्हाला केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या नोटाच बदलता येऊ शकतात. लवकरात लवकर बदला. म्हणजे वायरल मेसेजनुसार, बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. तर तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा असतील तर त्या आता काही कामाच्या नाहीत. हा मेसेज वाचणारा प्रत्येक व्यक्ती गोंधळात आहे. Fact Check | दोन हजारांच्या नोटा बंद होणार? एक हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? सत्य काय आहे? ही केवळ एक अफवा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बँकांनी हे स्पष्ट केलं आहे की बाजारात उपलब्ध दोन हजारच्या नोटा चलनातून बंद झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी एका आरटीआयला उत्तर देताना रिझर्व बँक ऑफ इंडियाने सांगितलं होतं की, दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद झाली आहे. परंतु बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केलेल्या नाहीत. तसंच दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश जारी केला नसल्याचंही आरबीआयने स्पष्ट केलं. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. मेसेजच्या रुपात वायरल होणारं वृत्त चुकीचं आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक 1000 रुपयांची नोट बाजारात आणणार असल्याचा दावाही खोटा आहे. यापूर्वी सोशल मीडियावर 1000 रुपयांच्या नव्या नोटेचा एक फोटो तुफान वायरल झाला होता. Fact Check | दोन हजारांच्या नोटा बंद होणार? एक हजाराच्या नव्या नोटा चलनात येणार? नोटाबंदीला तीन वर्ष पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. काळा पैसा आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचं मोदींनी सांगितलं. या निर्णयामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार झाल्या आणि 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्ती कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget