एक्स्प्लोर

OTT Platform Ban : मोठी बातमी! 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी, केंद्र सरकारची कारवाई, तुमच्याही मोबाईलमध्ये आहेत का अॅप्स?

OTT Platform Ban : आक्षेपार्ह कंटेट असल्याच्या कारणावरून ओटीटी प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

OTT Platform Ban : केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी (18 OTT Platform Ban) घातली आहे. आक्षेपार्ह कंटेट असल्याच्या कारणावरून ओटीटी प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. 

अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा याआधीच केंद्र सरकारने दिला होता. गेल्या वर्षीही जून महिन्यात यासंदर्भात मंत्रालयात मोठी बैठक झाली होती. विशेष बाब म्हणजे ब्लॉक करण्यात आलेल्या 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये19 वेबसाइट्स, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आली आहे. आयटी कायदा, भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्यासह अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर बंदीची कुऱ्हाड?

Dreams Films Voovi Yessma
Uncut Adda Tri Flicks X Prime
Neon X VIP Besharams Hunters
Rabbit Xtramood Nuefliks
MoodX Mojflix Hot Shots VIP
Fugi Chikooflix Prime Play

या प्लॅटफॉर्मवर एका कंटेटचा मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले.  समाजाचे नैतिक अध:पतन होईल असा प्रकारचा मजकूर होता. अनेक वेब सीरिजमध्ये शिक्षिका-विद्यार्थ्यामध्ये आणि  कौटुंबिक नातेसंबंधातील व्यक्तींमध्ये शरीर संबंध असल्याचे दाखवण्यात आले. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 आणि 67ए, आयपीसीचे कलम 292 चे उल्लंघन असल्याचे दिसून आले. 

एक कोटींपर्यंत डाउनलोड

बंदी घालण्यात आलेल्या एका OTT अॅप्सला एक कोटींहून अधिक डाउनलोड करण्यात आले आहे. दोन अन्य प्लॅटफॉर्ममध्ये   Google Play Store वर 50 लाखांहून अधिक डाउनलोड झाले. त्याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर अश्लील ट्रेलर, दृष्य अतिरंजीत पद्धतीने दाखवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या: 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget