एक्स्प्लोर

16th September In History : मेक्सिको स्पेनच्या गुलामीतून मुक्त, ब्रिटन मंदीच्या खाईत आणि भारतरत्न एम एस सुब्बालक्ष्मी यांचा जन्म; आज इतिहासात

16th September In History : भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या संगितकार एम एस सुब्बालक्ष्मी यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 रोजी झाला. 

मुंबई: सप्टेंबर महिना हा भारताच्या तसेच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यातही 16 सप्टेंबर रोजी जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. आजच्याच दिवशी मेक्सिकोने स्वत:ला स्पेनच्या गुलामीतून मुक्त झाल्याचं जाहीर केलं. तर भारत आणि भूटानच्या मैत्री संबंधासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भारत विरोधी कोणत्याही कृत्यासाठी आपली भूमी वापरू देणार नाही असं आश्वासन भूटानने दिलं होतं. 

जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं, 

1810- मेक्सिको स्पेनच्या गुलामगिरीतून मुक्त 

तब्बल 300 वर्षांच्या स्पेनच्या गुलामगिरीतून मेक्सिको मुक्त झाला. 16 सप्टेंबर 1810 रोजी मेक्सिकोने आपण स्वतंत्र्य असल्याचं जाहीर केलं. 

1916 : शास्त्रिय गायिका एम एस सुब्बालक्ष्मी यांचा जन्म

मदुराई षण्मुखवादिवू उर्फ एम एस सुब्बालक्ष्मी (Madurai Shanmukhavadivu Subbulakshmi) या मदुराई, तमिळनाडू येथील कर्नाटकी संगीत गायिका होत्या. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1916 रोजी झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा सन्मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या संगीतकार होत्या. 1974 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणार्‍या त्या पहिल्या भारतीय संगीतकार होत्या. दक्षिण भारतातील कर्नाटक परंपरेतील शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय गाण्यांच्या अग्रगण्य प्रवर्तक म्हणून श्रीमती एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांची ओळख आहे. त्या होत्या. 

1920- अमेरिकेच्या वॉल स्ट्रिटवर बॉम्बस्फोट, 38 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील वॉल स्ट्रिटवर (New York Wall Street Bomb Blast) काही कट्टरवाद्यांनी आजच्याच दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 38 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा स्फोट नेमका कोणी केली याची उकल शेवटपर्यंत झाली नसली तरी काही कट्टरवादी संघटनांचा यामध्ये हात असल्याचं सांगण्यात येत होतं. 

1931- ब्रिटनमध्ये महामंदी आली

सन 1929 साली जगाला महामंदीने (The Great Depression 1929) विळखा घातला. पहिल्या मोठ्या महामंदीचा सर्वाधिक फटका हा युरोपला बसला होता. त्या काळी महासत्ता अशी ओळख असलेले ब्रिटनही (Britain Depression) त्यातून सुटलं नाही. 16 सप्टेंबर 1931 रोजी महामंदीने ब्रिटनमध्ये प्रवेश केला. जागतिक महामंदीचा मोठा फटका ब्रिटनला बसला होता.  1931 साली ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये 600 दशलक्ष डॉलरची आर्थिक तूट आली होती. त्यामुळे ब्रिटनमध्ये महामंदी आली. 

1978- इराणमध्ये भूकंप, 20 हजार लोकांचा मृत्यू 

इराणमध्ये 16 सप्टेंबर 1978 साली भीषण भूकंप झाला. त्यामध्ये तब्बल 20 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 

1978- पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी जनरल जिया उल हक यांची निवड

पाकिस्तानचे चौथे लष्करशाह आणि सहावे राष्ट्रपती अशी ओळख जनरल जिया उल हक (Muhammad Zia ul Haq) यांची आहे. 1978 साली त्यांची पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. 1977 ते 1988 पर्यंत ते सत्तेवर होते. 1988 साली एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

2003- भूटानचे भारताला आश्वासन 

भारत विरोधात कोणत्याही कृत्यासाठी भूटानच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही असं आश्वासन भूटानने भारताला दिलं. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भूटानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 Pm : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget