14 April, Holiday: डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी, केंद्राची घोषणा
14 April, Holiday: संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar jayanti)यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. डॉ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त (Bhim Jayanti)देशातील सर्व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

14 April, Holiday: संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. डॉ बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने अधिकृत आदेशाद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कार्यालयांसोबत देशभरातील औद्योगिक संस्थादेखील 14 एप्रिल रोजी बंद राहतील.
Bank Holidays in April 2021 : एप्रिल महिन्यात बँका किती दिवस आणि कधी बंद राहणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं जात आहे.























