(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Bus Collapse in Uttarakhand: उत्तराखंडच्या चम्पावतमध्ये लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळून दुर्घटना घडली. यात 14 जणांचा मृत्यू झालाय
Bus Collapse in Uttarakhand: उत्तराखंडच्या चम्पावतमध्ये लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जाणारी गाडी दरीत कोसळून दुर्घटना घडली. यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहेत. जवळच्याच गावातील विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर घरी परतणाऱ्यांवर काळानं घाला घातला आहे. सध्या बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील सुखीढांग-डांडामिनार मार्गावर पहाटे हा अपघात झाला.
कुमाऊंचे डीआयजी नीलेश आनंद भरणे यांनी सांगितलं की, सुखीढांग रीठा साहिब रोडवर पहाटे हा अपघात झाला. शिकारमधील लोक लग्नसमारोहावरुन परतत होते.
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in the tragic factory mishap in Himachal Pradesh. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 22, 2022
पंतप्रधान कार्यालयानं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, उत्तराखंडमधील चंपावतची घटना हृदयविदारक आहे. यात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराप्रती शोक संवेदना व्यक्त करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेतील जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 235 जणांचा मृत्यू
- टास्क फोर्सचा मोठा दिलासा, Omicron BA.2 मुळे कोरोनाची पुढची लाट येणार नाही!
- Corbevax Vaccine : 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Corbevax लसीला DCGI ची मान्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha