राजस्थानमध्ये मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी
मंडप पडल्यानंतर उपस्थित नागरिक मंडपाखाली अडकून पडले होते. त्यावेळी अनेकांना विजेचा धक्का बसला, अशी माहिती समोर येत आहे.
बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये धार्मिक कार्यक्रमात मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांना मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी झाले आहेत. गावात राम कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
मंडप पडल्यानंतर अनेकांना विजेचा धक्का बसला, अशी माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा मंडळ कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot expresses condolences on the incident where 14 people have died after a 'pandaal' collapsed in Barmer, Rajasthan. pic.twitter.com/J0t47h8F0Q
— ANI (@ANI) June 23, 2019
राम कथा वाचनाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. मंडप पडल्यानंतर उपस्थित नागरिक मंडपाखाली अडकून पडले आणि जखमी झाले. मंडप कोसळल्यानंतर विजेच्या तारा आणि मंडप उभारणीसाठी वापरलेल्या लोखंडी खांबाचा संपर्क झाला. त्यामुळे विजेच्या धक्क्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुख: व्यक्त केले आहे. तर जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Collapse of a ‘Pandaal’ in Rajasthan’s Barmer is unfortunate. My thoughts are with the bereaved families and I wish the injured a quick recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 23, 2019
जसोल,बाड़मेर में राम कथा के दौरान टेंट गिरने से हुए हादसे में बड़ी संख्या में लोगों की जान जाने की जानकारी अत्यंत दुखद, दुर्भाग्यपूर्ण है।ईश्वर से दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करने,शोकाकुल परिजनों को सम्बल देने की प्रार्थना है। घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019