एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंगणात खेळणाऱ्या परीवर पाककडून गोळीबार, छर्र्यांनी शरीराची चाळण
जम्मू : सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात 14 महिन्यांची परी गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. तर भाऊबीजेलाच तिने तिच्या दोन्ही भावांना कायमचं गमावलं.
सांबामधील रामगड सेक्टरध्ये परीच्या घरी भाऊबीजेला पाकिस्तानी जवानांनी फेकलेला मोर्टार फुटला. यामध्ये तिचे आजोबा, आत्या आणि दोन्ही भावांच्या मृत्यू झाला. तर परी रुग्णालयात असून तिची प्रकृती नाजूक आहे.
या चिमुकलीच्या शरीरात बॉम्बचे छर्रे घुसले आहेत. कण्यापासून शरीरातील अनेक भागांना दुखापत झाली आहे. नस फाटल्याने तिला श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं. सुमारे दोन तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांच्या माहितीनुसार, पुढील काही तास तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तिच्यावर देखरेख असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
भाऊबीजेच्या दिवशी चिमुकली परी तिच्या दोन भावांसह अंगणात खेळत होती. मात्र त्यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी फेकलेला मोर्टार अंगणात पडला. या घटनेत परीच्या दोन्ही भावांसह चार जणांचा मृत्यू झाला. यात भावांसह आजोबा आणि आत्याचाही समावेश आहे.
परीचे वडील राकेश कुमार हॉस्पिटलमध्ये आहेत. ते स्वत: एक सैनिक आहेत. दिवाळीनिमित्त ते घरी आले होते. तर आईलाही दुखापत झाली आहे. पण यावेळी कुटुंबासह संपूर्ण देश परीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
पाकिस्तानने सीमेजवळील गावांवर केलेल्या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलं, चार महिलांसह आठ जणांनी प्राण गमावले आहेत.
संबंधित बातम्या
पाकचा नापाक हल्ला, जवानांनंतर नागरिकांवरही गोळीबार, 8 जणांचा मृत्यू
पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार, भारताचं चोख उत्तर
पाकच्या डझनभर चौक्या उद्ध्वस्त, वॉच टॉवरही पाडले
पाककडून गोळीबार सुरुच, एक जवान शहीद; लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या गोळीबारात सांगलीचा जवान शहीद
भारताकडून पाकला सडेतोड उत्तर, चार पाकिस्तानी चौक्या उडवल्या
पाकिस्तानकडून सीमेवर अंदाधुंद गोळीबार, एक जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement