एक्स्प्लोर

13 February In History : राष्ट्रीय महिला दिन, पुण्यात बॉम्बस्फोट; आज इतिहासात काय घडलं?

History : इतिहासात अनेक चांगल्या वाईट गोष्टींसाठी 13 फेब्रुवारीची नोंद आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं...

On This Day In History 13 February : इतिहासात प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व असते. 13 फेब्रुवारीच्या अनेक घटनांची नोंद आहे.   भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्याशिवाय जागतिक रेडिओ दिवसही दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. तर आजच्याच दिवशी 2012 मध्ये पुण्यात बॉम्बस्फोट झाला होता. जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 17 जणांना जीव गमावावा लागला होता. याशिवाय इतिहासात अनेक चांगल्या वाईट गोष्टींसाठी 13 फेब्रुवारीची नोंद आहे. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं...

उत्साद अमीर खाँ यांचं निधन (Ustad Amir Khan)

प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खाँ  यांचं आजच्याच दिवशी 1974 मध्ये निधन झालं होतं. त्यांचा जन्म अकोला येथे झाला आणि त्यांचे पालनपोषण इंदूर येथे झाले. आजोबा छंगेखाँ व वडील शाहमीरखाँ यांच्याकडून संगीताचा वारसा वंशपरंपरेने लाभला. त्यांचे पूर्वज हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील कलनौर येथील मूळ रहिवासी होते. 1971 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. गुजरी तोडी (मन के पंछी भये बावरे), बैरागी (मन सुमिरत निसदिन तुमारो नाम), मारवा (गुरुबिन ग्यान), मालकंस (जिनके मन राम बिराजे), दरबारी कानडा (किन बैरन कान भरे), शहाना कानडा (सुंदर अंगना बैठी), मेघ (ए बरखा रितु आई), रामदासी मल्हार (छाये बदरा कारे), अभोगी (लाज रख लीजो मोरी) या रागांतील त्यांनी रचलेल्या बंदिशी प्रचलित झाल्या आहेत.  

13 फेब्रुवारी 1911: विख्यात ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म

एक पाकिस्तानी कवी होते. त्यांच्या क्रांतिकारी कविता, शायरी चांगल्याच गाजल्या. त्यांच्या कविता, शायरी या पुरोगामी विचारांच्या जवळच्या होत्या. तुरुंगवासाच्या काळात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली. पाकिस्तानसह भारतातही ही कविता लोकप्रिय ठरली होती. फैज अहमद फैज यांच्यावर कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि इस्लामपासून फारकत घेतलेले साहित्यिक असल्याचा आरोप झाला होता. मात्र, त्यांच्या रचनांमध्ये गैर-इस्लामिक रंग नव्हता. फैज यांना नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळेस नामांकन मिळाले होते.  लेनिन शांतता पुरस्कार, निशान-ए-इम्तियाज या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

1901 - भाऊराव कोल्हटकर यांचं निधन 

लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचं आजच्याच दिवशी 1901 मध्ये पुण्यात निधन झालं होतं.  1882 ते 1889 पर्यंत भाऊराव कोल्हटकरांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९००पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या. शकुंतला, सुभद्रा, मंथरा, उर्वशी या त्यांच्या गाजलेल्या भूमिका आहेत. अप्रतिम अभिनयामुळे आणि गोड गळ्यामुळे भाऊराव कोल्हटकर यांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडत होत्या.  

2011 : जागतिक रेडिओ दिन (World Radio Day) -

जागतिक रेडिओ दिन दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 'युनेस्को'ने 2011 मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली होती. इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे 2012 पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली.  13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. त्यामुळे 13 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली झाली.1936 साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. 

1979 : सरोजिनी नायडूंचा जन्म – Sarojini Naidu Birth Anniversary 

भारतीय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटुंबात झाला. सरोजिनी नायडू यांचे माहेरचे आडनाव नायडू होते तर सासरचे आडनाव चट्टोपाध्याय असे होते. सरोजिनी नायडू या उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या. याशिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींबरोबर लढलेल्या सरोजिनी नायडू यांना 'गानकोकिळा' असेही म्हटले जात होते. 

राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India 

भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. 


2012 :  पुण्यात बॉम्बस्फोट; 17 ठार, 64 जखमी Pune Bomb Blast 

आजच्याच दिवशी पुण्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये पाच विदेशी नागरिकांचा समावेश होता. या बॉम्बस्फोटात 64 जण जखमी झाले होते.  कोरेगांव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये सात वाजून 15 मिनिटांनी स्फोट झाला होता.  जर्मन बेकरी पुण्यात प्रसिद्ध आहे.  विदेशी नागरिकांसह काँलेज स्टुडंटही येथे गर्दी करत होते.  गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता.  

1945 विनोद मेहरा Vinod Mehra 

प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा यांचा जन्म आजच्याच दिवशी  1945 मध्ये पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला होता. रिपोर्टनुसार, रेखा यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्यासोबत झाले होते.  घर, बेमिसाल, खुदा दार यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलेय. विनोद मेहरा यांचे वयाच्या 45 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झाले. 30 ऑक्टोबर 1990 रोजी विनोद मेहरा यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

13 फेब्रुवारी 2012: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचे निधन. (जन्म: 16 जून 1936 )

विनोदी अभिनेते राजेंद्र नाथ यांचं 13 फेब्रुवारी 2008 मध्ये निधन झालं होतं. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटा भूमिका केल्या आहेत. 

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस (Thomas Robert Malthus)यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1766 रोजी झाला होता. तर 23 डिसेंबर 1834 रोजी त्यांचं निधन झालं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 8  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Embed widget