12th July In History: करारी आवाज अन् भेदक नजर... बॉलिवूडचा 'प्राण; गेला, प्रभातचा चंद्रसेना चित्रपट प्रदर्शित; आज इतिहासात
12th July On This Day : खलनायकाची भूमिका आजरामर केलेल्या प्राण कृष्ण सिकंद अहलुवालिया (Pran Krishan Sikand Ahluwalia) उर्फ प्राणचे निधन 12 जुलै 2013 रोजी झालं होतं.
12th July In History: भारतीय चित्रपटसृष्ठीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये खलनायकाची भूमिका आजरामर करणाऱ्या प्राण यांचं निधन आजच्याच दिवशी म्हणजे 12 जुलै 2013 रोजी झालं. व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला प्रभात फिल्म कंपनीचा चंद्रसेन हा चित्रपट आजच्याच दिवशी, 12 जुलै 1935 रोजी प्रदर्शित झाला होता. देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 12 जुलै रोजी घडलेल्या आणखी काही घटना पुढीलप्रमाणे आहेत,
1346 - लक्झेंबर्गचा चार्ल्स चौथा रोमन साम्राज्याचा शासक म्हणून निवडला गेला.
1673 - नेदरलँड आणि डेन्मार्क यांच्यात संरक्षण करार झाला.
1690 - विल्यम ऑफ ऑरेंजच्या नेतृत्वाखाली प्रोटेस्टंटनी रोमन कॅथोलिक सैन्याचा पराभव केला.
1801 - अल्गेसिरासच्या लढाईत ब्रिटनने फ्रान्स आणि स्पेनचा पराभव केला.
1823- भारतात बांधलेले पहिले वाफेचे जहाज 'डायना' कलकत्ता (आता कोलकाता) येथे दाखल झाले.
1912 - 'क्वीन एलिझाबेथ' हा अमेरिकेत प्रदर्शित होणारा पहिला परदेशी चित्रपट ठरला.
1935: प्रभातचा 'चन्द्रसेना' हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित
प्रभातचा 'चन्द्रसेना' हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक ट्रिकसीन्स असलेला हा चित्रपट 1931 सालच्या चंद्रसेना नावाच्या मूकपटावर बेतलेला होता. चंद्रसेना (Prabhat Film Company Chandrasena) हा पौराणिक नाटक चित्रपट होता. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या प्रभात फिल्म कंपनीसाठी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट हिंदी आणि मराठीत एकाच वेळी बनलेला पहिला भारतीय द्विभाषी चित्रपट होता. सिनेमॅटोग्राफर के. धीबर आणि कथा-संवाद शिवराम वाशीकर यांचे आहेत. संगीत दिग्दर्शन केशवराव भोळे यांचे होते, गीतकार के. नारायण काळे यांनी लिहिले आहे. कलाकारांमध्ये नलिनी तरखुड, सुरेशबाबू माने, केळकर, रजनी, शांताबाई आणि अझुरी यांचा समावेश होता.
1935 - बेल्जियमने तत्कालीन सोव्हिएत युनियनला मान्यता दिली.
1949 - महात्मा गांधींच्या हत्येनंतर आरएसएसवरील बंदी सशर्त उठवण्यात आली.
1957 - अमेरिकन सर्जन लेरॉय ई. बर्नी यांनी सिद्ध केलं की धूम्रपान आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांचा थेट संबंध आहे.
1960 - भागलपूर आणि रांची विद्यापीठाची स्थापना.
1961 - पानशेत आणि खडकवासला धरण फुटले, 2000 लोकांचा मृत्यू
आजचा दिवस राज्याच्या इतिहासातील काळा दिवस आहे. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील मुठा नदीच्या आंबी उपनदीवरील पानशेत आणि खडकवासला ही धरणे फुटली. त्यामुळे पूर आला आणि 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे एक लाखाहून जास्त लोक विस्थापित झाली.
1965 - भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्मदिन.
1970 - अलकनंदा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे 600 लोक मरण पावले.
1982: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) ची स्थापना झाली.
1990- प्रसिद्ध सोव्हिएत नेते आणि रशियन संसदेचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा दिला.
1994 - पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष यासर अराफात 27 वर्षे वनवासात घालवल्यानंतर गाझा पट्टीत आले.
1997- नोबेल पारितोषिकाने सन्मानित मलाला युसुफझाईचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला.
1998 - एकूण 1.7 अब्ज लोकांनी फ्रान्स आणि ब्राझील यांच्यातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला.
2000 - मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.
2001- आगरतळा आणि ढाका भाषा ऐक्य एकता दरम्यान 'मैत्री' बस सेवेची सुरुवात
2013 - अभिनेते प्राण कृष्ण सिकंद अहलुवालीया ऊर्फ प्राण यांचं निधन
प्राण (Pran) हे त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांचा करारी आवाज आणि भेदक नजरेने त्यांच्या अभिनयात जीव आणला होता. अनेक फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि बंगाली फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन अवॉर्ड्स विजेते या भारतीय अभिनेत्याने 1940 ते 1990 च्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत शक्तिशाली खलनायक नायकाची भूमिका बजावली. त्यांनी सुरुवातीला 1940 ते 1947 या काळात नायक म्हणून चित्रपटांमध्ये काम केले. तसेच खलनायकाच्या भूमिकेत 1942 ते 1991 पर्यंत काम करत राहिले. 1948 ते 2007 या काळात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या धर्तीवर काम केले.
प्राण (Pran Krishan Sikand Ahluwalia) यांनी 350 हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्यामध्ये खानदान (1942), पिलपिली साहेब (1954) और हलाकू (1956) या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका बजावली होती. मधुमती (1958), जिस देश में गंगा बहती है (1960), उपकार (1967), शहीद (1965), आँसू बन गये फूल (1969), जॉनी मेरा नाम (1970), विक्टोरिया नम्बर २०३ (1972), बे-ईमान (1972), ज़ंजीर (1973), डॉन (1978) आणि दुनिया (1984) या चित्रपटातील अभिनय गाजले.
प्राण यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार आणि सन्मान पटकावले आहेत. त्यांनी 1967, 1969 आणि 1972 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार आणि 1997 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार जिंकला. त्यांना 2000 मध्ये स्टारडस्टने 'व्हिलन ऑफ द मिलेनियम' पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. त्यापैकी एक म्हणून त्यांची निवड 2010 मध्ये CNN चे सर्वोत्कृष्ट 25 आशियाई अभिनेते