एक्स्प्लोर
मध्य प्रदेशात गोंदियातील 11 मजुरांचा अपघातात मृत्यू
गोंदिया/ जबलपूर : तेंदुपत्ता तोडण्यासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या गोंदियातील 11 मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य 15 मजूर जखमी आहेत. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये ही घटना घडली.
सर्व मृतक गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी आहेत. तेंदुपत्ता तोडण्यासाठी हे सर्व जण काल सकाळी गोंदियावरुन ट्रेनने जबलपूरला गेले होते. जबलपूरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.
जखमींवर जबलपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी आहेत.
मजुरांना आणण्यासाठी वन विभागाने तेंदुपत्ता ठेकेदाराला सरकारी गाडी दिली होती. ठेकेदाराचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. नरसिंहपूर-गोटेगाव मार्गावर एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला, अशी माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement