एक्स्प्लोर

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी स्पष्टपणे राजीनाम्याचं कारण सांगितलं नसलं, तरी त्यामागे अनेक कारणं आहेत.

नवी दिल्ली : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी स्पष्टपणे राजीनाम्याचं कारण सांगितलं नसलं, तरी त्यामागे अनेक कारणं आहेत. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं
  1. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हॉटेल घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर भाजपने सातत्याने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आजच्या राजकीय भूकंपाची सुरुवात इथूच सुरु झाली होती.
  2. तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी जेडीयूकडूनही झाली होती. याच मुद्द्यावरुन आरजेडी आणि जेडीयूमधील संबंध ताणले गेले. दोन्ही पक्षांकडून टोकाची विधानंही समोर आली.
  3. आधीच जेडीयू आणि आरजेडीमध्ये तणाव होता. त्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना विश्वासात न घेताच एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला.
  4. राजीनामा न देण्यावर तेजस्वी यादव कायम होते. एवढंच नव्हे, तर तेजस्वी यादव यांनी आपल्यावरील आरोपांचं स्पष्टीकरणही दिलं नाही.
  5. लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या भूमिकेबाबत नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेचाही काहीच फायदा झाला नाही.
  6. आरजेडीच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. यानंतर लालूप्रसाद यादव यांनी भूमिका जाहीर केली की, तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत आणि ते स्पष्टीकरणही देणार नाहीत.
  7. तेजस्वी यादव स्वत:हून राजीनामा देणार नाहीत, हे स्पष्ट होतं. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करणं, नितीश कुमार यांना राजकीयदृष्ट्य फायदेशीर नव्हतं. कारण तसं झालं असतं, तर लालूप्रसाद यादव यांनी याचा राजकीय फायदा उचलला असता. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता.
  8. नितीश कुमार हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने, त्यांच्याच प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. आपली स्वच्छ प्रतिमा जपणं, हे नितीश कुमार यांच्यासमोरील मोठं आव्हान होतं.
  9. बिहारमध्ये सुशासनाच्या घोषणेवर विजय प्राप्त करणारे नितीश कुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांसोबत सरकार चालवणं तसंही कठीण होत चाललं होतं. कारण त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होते.
  10. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नितीश कुमार हे आपली स्वच्छ प्रतिमा जपू पाहत होते. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी मुख्यमंत्रिपदाचीही त्यांना पर्वा नव्हती. आताही राजीनामा देत त्यांनी हाच संदेश दिला आहे की, पदासाठी तत्त्वांची तडजोड केली जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court:
"तमिळनाडूत हिंदी शिकवण्यापासून रोखू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, नेमकं प्रकरण काय?
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
EC Freeze TMC Name, Symbol : मोठी बातमी, निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं, दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश 
मोठी बातमी, निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवलं, दोन्ही गटांना दिले महत्त्वाचे आदेश 
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर
UPI  पेमेंट शुल्काबाबत मोठा निर्णय! दरवर्षी सरकारला किती हजार कोटींचा फायदा मिळणार? आकडेवारी समोर

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
Embed widget