Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
मराठवाड्यातलं मनोज जरांगेंचं एक आंदोलन आज संपलं... त्याच वेळी छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या आंदोलनाचा नारळ वाढवण्यात आला... ठाकरेंच्या शिवसेनेनं दुष्काळासह मराठवाड्याच्या समस्यांवर पुढले १७ दिवस आंदोलनाची हाक दिलीय... या आंदोलनाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टिकेची झोड उठवलीय...
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ठाकरेंच्या शिवसेनेनं नवं आंदोलन छेडलंय...
'मराठवाडा का विकास तुमसे ना हो पाएगा' अशी या आंदोलनाची संकल्पना असून...
याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरात गुरुवारी झाली...
पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळासह मराठवाड्यातल्या समस्यांवरून फडणवीस सरकारला लक्ष्य केलं...
५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याच्या सरकारच्या घोषणेची ठाकरेंनी खिल्ली उडवली...
आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही चांगलंच तोंडसूख घेतलं...
मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्रीही छत्रपती संभाजीनगरात होते...
त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला नाकर्त्यांचं आंदोलन असं लेबल लावलंय
फडणवीस सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसल्यानं आंदोलन सुरू केल्याचं संजय राऊत म्हणाले...
मराठवाड्याला आंदोलनांची खूप जुनी परंपरा आहे...
मग तो मुक्तीसंग्राम असो... विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ असो... किंवा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन असो...
त्यातच आता पंचनामे सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर...
सगळा मराठवाडा पिंजून काढण्यासाठी ठाकरेसेनेनं आंदोलन छेडलंय...
आता हे आंदोलन सरकार कशा पद्धतीनं हाताळतं अन् या आंदोलनाचा ठाकरेंना काय राजकीय लाभ मिळतो हे बघायचं...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या


























