एक्स्प्लोर

चंद्रपुरातून अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा प्रकार दहा वर्षांनी उजेडात, अपहरणापासून सात वेळा विक्री

माहितीनुसार हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथे काही दिवसांपूर्वी घरात डांबून ठेवलेल्या एका महिलेची स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती. धर्मवीर नावाच्या इसमाने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते.

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात मानव तस्करीचं एक खळबळजनक प्रकरण उजेडात आलं आहे. 2010 मध्ये एका 11 वर्षीय मुलीचं चंद्रपूर शहरातून अपहरण करण्यात आलं होतं. तब्बल 10 वर्षांनंतर हरियाणातील फतेहाबादमधून या मुलीची सुटका करण्यात आली. अपहरणानंतर तब्बल 7 वेळा या मुलीची विक्री करण्यात आली. यादरम्यान तिच्यावर मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचारही झाले. तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. पीडित मुलीला हरियाणा राज्यातील फतेहाबादमध्ये एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका केली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या तस्करीचं एक मोठं रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथे काही दिवसांपूर्वी घरात डांबून ठेवलेल्या एका महिलेची स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती. धर्मवीर नावाच्या इसमाने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. मात्र घर मालकाला या मुलीच्या वर्तनाचा संशय आल्याने त्याने विचारपूस करताच खरा प्रकार उजेडात आला. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका केली. दरम्यान हरियाणा पोलिसांनी यासंबंधीचा मूळ गुन्हा शोधून काढला आणि या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. सुटका करण्यात आलेली मुलगी मूळची चंद्रपूर शहरातील आहे. चंद्रपूर शहरातील एका मंदिराच्या प्रांगणातून 2010 साली अकरा वर्षाच्या या मुलीचे आरोपींनी प्रसादातून गुंगीचे औषध देत अपहरण केले. या मुलीला तातडीने हरियाणा राज्यातील पानीपत येथे नेत तिची विक्री केली गेली. शेतावरील एका घरात तिला डांबून ठेवण्यात आले. खरेदी केलेल्या इसमाच्या मुलांनी या कोवळ्या जीवावर सतत अत्याचार केले. अजाणत्या वयात या मुलीचा तब्बल सात वेळा सौदा झाला तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. विक्रीच्या निमित्ताने तिला हरियाणातील विविध शहरात ठेवले गेले. हे प्रकरण सातत्याने सुरू असताना हरियाणा राज्यातीलच फतेहाबाद येथे सातव्यांदा तिला धर्मवीर नावाच्या इसमाला विकण्यात आले. मात्र घरमालकाच्या समयसूचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात हा गुन्हा दाखल असल्याने रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद गाठून या मुलीला चंद्रपुरात परत आणले आहे. रामनगर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली असून या मागे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Shardiya Navratri 2026 : राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget