Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; पुणे पीएमआरडीएची घोषणा
Pune News: हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणारेत. अशी घोषणा पीएमआरडीए महानगरचे आयुक्त योगेश म्हसे यांनी केलीय.

पुणे : शरद पवारांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कचं वॉटर पार्क (Hinjewadi IT Park) नेमकं कोणामुळं झालं? किंबहुना, पवार कुटुंबाचं राजकारण त्यासाठी कारणीभूत आहे का? असा सवाल आता विचरला जाऊ लागला आहे. कारण खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या हिंजवडीचा कारभार पालकमंत्री म्हणून अजित पवार पाहतात. असं असताना जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वॉटर पार्क अशी ओळख निर्माण झाली, त्यामुळं चहुबाजूंनी टीका झाली. त्यानंतर जागे झालेली पुणे पीएमआरडीए रस्त्यावर उतरली आहे. नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणारेत. अशी घोषणा पीएमआरडीए महानगरचे आयुक्त योगेश म्हसे यांनी केलीय.
पुणे मेट्रो, ग्रामपंचायत आणि काही कंपन्यांनी नैसर्गिक ओढे-नाले बुजवल्याचं समोर आलंय. त्यांना ओढे-नाले खुले करण्याची मुदत संपलेली आहे. उद्यापासून (2 जुलै) मात्र थेट गुन्हे दाखल करायला सुरुवात होणार. असं पीएमआरडीए महानगरचे आयुक्त योगेश म्हसे यांनी जाहीर केलंय. विशेष म्हणजे पुण्याच्या याच आयटी पार्कमध्ये तब्बल 4 ते 5 लाख कर्मचाऱ्यांसह त्यांच्यावर विसंबून इतरही रोजगार आहेत. त्यामुळे, सरकार, प्रशासन या करदात्या नागरिकांची, नोकरदारांची काळजी घेणार आहे का? हिंजवडीची होऊ घातलेली नवी ओळख पुसण्यासाठी पुढाकार घेणार आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
हिंजवडीची IT पार्कची होऊ घातलेली नवी ओळख पुसली जाणार का?
जगाच्या नकाशावर आयटी पार्क (IT park) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील (pune) हिंजवडीला आता वॉटर पार्क म्हणून नवीन ओळख मिळाली आहे. मात्र, ही अशी नको ती ओळख निर्माण करुन देण्याला प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्या भोंगळ काराभरामुळेच काही मिनिटांच्या पावसात (Rain) हिंजवडी बुडून जात आहे. त्यामुळं इथं वाहन रस्त्यावरून धावतात की पाण्यातून वाहतात, असा प्रश्च सर्वसामान्यांसह आयटीईन्सना ही पडतो.या आयटी कंपन्यांमुळं सरकारला भरमसाठ करही मिळतोय. पण त्याचं आयटी पार्कचं आपलं प्रशासन असं वॉटर पार्क करु पाहतंय हे दुर्दैवी आणि अनाकलयीन आहे. ही परिस्थिती वेळीचं हाताळली नाही तर भविष्यात इथल्या कंपन्या स्थलांतरित होतील अन् भावी पिढीचं उज्वल भविष्य पाण्यात घालण्यात आपणचं जबाबदार असू, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नक्कीच भासणार नाही.
हे ही वाचा























