येलदरीतून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले; नांदेड, हिंगोलीसह परभणीतील शेतकऱ्यांना फायदा
Yeldari Dam : नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील 58 हजार हेक्टरांवरील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणार आहे.
Hingoli News : परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातून (Yeldari Dam) सिद्धेश्वर धरणात (Siddheshwar Dam) वीजनिर्मितीच्या तीन संचांपैकी दोन संचांमधून 4 दलघमी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli) व परभणी (Parbhani) जिल्ह्यातील 58 हजार हेक्टरांवरील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणार आहे. तसेच जल विद्युत केंद्र सुरू होऊन 15 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यासह परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील 58 हजार हेक्टर शेतीचे सिंचन करणाऱ्या सिद्धेश्वर धरणातून पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर, दुसरीकडे 1 फेब्रुवारीपासून पूर्णा कालव्यातून दुसरी पाणीपाळी सुरू करण्यात आली आहे. या धरणावर हिंगोली, परभणी, नांदेड अशा तीनही जिल्ह्यातील 58 हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणली जाते. यासाठी पावसाळा वगळता उन्हाळा आणि हिवाळा या काळात पिण्याचे पाण्याचे नियोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहेत.
सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 70 टक्के पर्यंत वाढेल
तर, यावर्षी जानेवारी महिन्यात 67 टक्के असलेले हे धरण महिन्याअखेर 37 टक्केवर येऊन पोहोचले आहे. या धरणातून दररोज 2 दशलक्ष घनमीटर एवढे पाणी दररोज खर्च केले जाते. त्यानुसार आता पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे आता येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. साधारणतः 50 ते 60 दशलक्ष घनमीटर इतके पाणी सिद्धेश्वर धरणामध्ये सोडले जाईल. त्यानुसार सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी 70 टक्के पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट