Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजपासून हिंगोली दौऱ्यावर; लोकसभेचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता
Uddhav Thackeray In Hingoli :लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय.
Uddhav Thackeray In Hingoli : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून दोन दिवसीय हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्यावर आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये (Hingoli Lok Sabha Constituency) उद्धव ठाकरे आज आणि उद्या चार सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची आज पहिली सभा वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आली असून, सकाळी अकरा वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय इथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय.
आघाडीमध्ये हिंगोलीची जागा शिवसेनेकडे राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा जोर लावला जातोय. कारण हिंगोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेकवेळा हिंगोलीने शिवसेनेला खासदार दिला, त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा हिंगोलीकर शिवसेनेचा खासदार निवडून आणतील अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पहिला दौरा हिंगोली जिल्ह्याचा करण्याचं ठरवले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्यामध्ये हिंगोली लोकसभेचा उमेदवार ठाकरे घोषित करतात का? हे पहावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा दौरा... (18 मार्च 2024)
- सकाळी 9.30 वाजता मुंबईहून विमानाने नांदेड येथे आगमन
- सकाळी 11 वाजता वसमत येथे संवाद मेळावा
- दुपारी 2 वाजता जेवणासाठी वेळ राखीव
- दुपारी 3 वाजता सेनगाव येथे संवाद मेळावा
- सायंकाळी 6 वाजता कळमनुरी येथे संवाद मेळावा
- सायंकाळी 7 वाजता कळमनुरीहून हिंगोलीकडे प्रयाण
- रात्री 8 वाजता हिंगोलीमध्ये मुक्काम
मंगळवार 19 मार्च दौरा...
- सकाळी 9.30 वाजता हिंगोली येथून उमरखेडकडे प्रयाण
- सकाळी 11.30 वाजता उमरखेड येथे संवाद मेळावा
- दुपारी 12.30 वाजता उमरखेड येथे संवाद
- दुपारी 1 वाजता हदगाव येथे वेळ राखीव
- दुपारी 2 वाजता हदगाव ते अर्धापूर फाटा प्रयाण
- दुपारी 3 वाजता पिंपळगाव महादेव अर्धापूर येथे नांदेड जिल्हा संवाद मेळावा
हिंगोलीचा उमेदवार जाहीर करणार का?
लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होताच उद्धव ठाकरेंनी पहिला दौरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आजपासून पुढील दोन ठाकरे हिंगोलीत असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंकडून महाविकास आघाडीचा म्हणजेच ठाकरे गटाच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
MP List of Marathwada : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू! मराठवाड्यातील 2019 मधील खासदारांची यादी