एक्स्प्लोर

Hingoli News : जिल्हा परिषद शाळेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले गणिताचे धडे

Hingoli News : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोलीतील जिल्हा परिषदेत शाळेत चक्क गणिताचा तास घेतला. संख्यांचे वर्ग, वर्गमूळ त्याचबरोबर घन आणि घनमूळ हे सगळं विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांना शिकवले. 

Hingoli News : मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेणारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) गुरुवारी (15 डिसेंबर) नव्या भूमिकेत दिसले. हिंगोलीतील (Hingoli) जिल्हा परिषदेत शाळेत सुनील केंद्रेकर यांनी चक्क गणिताचा तास घेतला. विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी काल अचानक औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर गावाला भेट दिली. गावाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रेकर यांनी थेट जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School) गाठली. इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश करताच आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हातात खडू आणि डस्टर घेत विद्यार्थ्यांना गणिताचे (Mathematics) धडे शिकवायला सुरुवात केली. संख्यांचे वर्ग, वर्गमूळ त्याचबरोबर घन आणि घनमूळ हे सगळं विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांना (Students) शिकवले. 

आयुक्तांकडून वर्गशिक्षकांची स्तुती

विभागीय आयुक्त शिक्षक बनवून शिकवत आहेत याची नीटशी कल्पनाही नसल्याने विद्यार्थ्यांनी सुद्धा मनमोकळा संवाद साधला. यामुळे सुनील केंद्रेकर यांनी समाधान व्यक्त केले तर या वर्गाचे वर्गशिक्षक असलेले अशोक इंगोले यांची सुद्धा केंद्रेकर यांनी स्तुती केली. आपण चांगले शिकवत आहात. परंतु विद्यार्थ्यांकडून 300 पर्यंतचे पाढे पाठ करुन घ्या, अशा सूचना सुद्धा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्गशिक्षक अशोक इंगोले यांना दिल्या.

शिक्षकांची परीक्षा घेण्याचा सुनील केंद्रकर यांचा निर्णय

मराठवाड्यातील जिल्हा परिषदेतील पहिली ते दहावीला शिकवणाऱ्या जवळपास 10 हजार शाळामधील 35 हजारांच्या  शिक्षक आणि पहिली ते दहावी संस्थातील शाळांमधील शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शाळेतील गुणवत्तेबाबत दुरावस्था पाहून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर तिथली गुणवत्ता पाहून शिक्षक आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. शिक्षणाचा दर्जाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी झापले, तो एक ऑडिओ व्हायरल झाली होती. त्यानंतर आता शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विभागीय सुनील केंद्रेकरांनीच एक पाऊल टाकत आता शिक्षकांची परीक्षा घेण्याचे ठरवलं आहे. 

सुनील केंद्रकर यांचा साधेपणा

सुनील केंद्रेकर हे आपल्या शिस्तप्रिय कामांसाठी, कठोर निर्णयांसाठी तसंच साधेपणासाठी ओळखले जातात. अधिकारी म्हटलं की एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जवळपास दोन वर्षांपूर्वी सुनील केंद्रेकर यांचा व्हायरल झालेला फोटो त्यांच्या साधेपणाची ग्वाही देतो. खुलताबाद इथल्या आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते ज्यात केंद्रेकर यांनी साहित्याची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget