एक्स्प्लोर

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादकांना फटका, रोगांचा प्रादुर्भाव वाढला; दरांमध्येही घसरण

Agriculture News : ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना (Rose Production) मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय.

Hingoli Agriculture News : बदलत्या वातावरणाचा (Climate Change) शेती पिकांना (Crop) मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण आहे. तर कुठे अवकाळी पावसानं (unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा (Farmers) चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना (Rose Production) मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

दमट वातावरणामुळं गुलाबाच उत्पादन वाढलं, दरांवर परिणाम

ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण गुलाबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दुसरीकडं दमट वातावरणामुळं अचानक गुलाबाच्या उत्पादन चार पटीनं वाढ झाली आहे. यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक सुरु झाली आहे. याचा परिणाम बाजार भावावर होत आहे. सध्या गुलाबाचे दर घसरले आहेत.

रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील बहरात गुलाबाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार

हिंगोली जिल्ह्यातील धानोरा येथील गुलाब शेतीचे उत्पादन घेणारे शेतकरी पांडुरंग राऊत यांनी त्यांच्या शेतात दोन एकर शेत जमिनीवर चार वर्षापूर्वी गुलाबाची लागवड केली आहे. गुलाबाची झाडे मोठी झाल्यानं गुलबाच्या फुलांचे चांगले उत्पन्न देखील त्यांना मिळत आहे. परंतू, मागील आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानं या गुलाब फुल शेतीला मोठा फटका बसत आहे. दमट वातावरणामुळे अचानक गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे तर दुसीरकडं बाजारात फुलांची आवक वाढल्यानं फुलांचे भाव घसरले आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळं तयार असलेल्या गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गुलाबावर करपा रोगाचा, किड्यांचा प्रादुर्भाव  झाला आहे. यामुळं गुलाबाच्या पुढील बहरात उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 

थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

राज्यात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी तर अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. दरम्यान आजपासून पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील बिकानेर, चुरू झुंजनू, हनुमानगड जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, तिथे थंडीची लाट येण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुढच्या तीन दिवसांनतर म्हणजे सोमवारपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Weather : अवकाळीनंतर आता 'थंडी'ची लाट येणार, वाचा काय आहे हवामानाची स्थिती?

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget