एक्स्प्लोर

Hingoli Rain Update : हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; बळीराजा पुन्हा संकटात

Hingoli Rain Update : शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत. 

Hingoli Rain Update : मंगळवारी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापुर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांना सुद्धा पावसाचा फटका बसला आहे. अगोदरच पावसाळा (Rain) एक महिना उशिराने सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात पावसाचा लहरीपणामुळे शेतातील उभी पिकं करपून जात असताना मंगळवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेलं आहे. शेंगा लागलेलं सोयाबीन, बोंड लागलेलं कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत. 

मंगळवारी वसमत तालुक्यात झालेला पाऊस इतका मोठ्या प्रमाणात आला की, आजही अनेक ठिकाणच्या शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेला आहे. यातील अनेक पिकं अगदी काही दिवसांच्या काढणीवर आले होती. परंतु, त्यापूर्वीच अशा पद्धतीने पाऊस झाल्याने उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वसमत तालुक्यातील शेकडो एकरवरील पिकांचे अशाच पद्धतीने नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून, सरकारने मदतीची घोषणा करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांना विमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची सुद्धा मागणी होत आहे. 

गावात शिरलं पाणी.. 

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी तर थेट गावात पाणी घुसल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. वसमत तालुक्यात बळेगाव, तसेच अन्य एका गावात गावालगत असलेल्या नाल्याचे पाणी शिरल्याने काही वेळ गावकऱ्यात खळबळ उडाली होती. मात्र, पावसाचा वेग कमी झाल्याने नंतर हळूहळू पाणी देखील ओसरत गेले. तर, दुसरीकडे हिंगोली शहरातील औंढा रोडवर असलेल्या संभाजी विद्यामंदिर परिसरात पावसाचे पाणी साचले होते. शिवाय शहरातील नामांकित म्हणून ओळखला जाणारा एनटीसी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्रास झाला. काही शासकीय, निमशासकीय कार्यालयातही पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. 

सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक सुरु 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पाण्याची वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सिद्धेश्वर धरणात 2.728 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत धरणामध्ये 72.10 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. धरणाच्या वरच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Heavy Rain Hingoli District :हिंगोलीत पावसाची दाणादाण, गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये घुसले पाणी; नागरिकांचे प्रचंड हाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
रात्री 10-12 पोलिसांची तुकडी धडकली, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराचं नाव सांगितलं नाही, छाप्यानंतर युगेंद्र पवारांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Thakur: विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूरांची बाचाबाची, डायरी दाखवली, कार्यकर्ते म्हणाले, लाईट का बंद केली?
विनोद तावडेंनी गळ्याला हात लावून शपथ घेतली, क्षितिज ठाकूरांनी डायरी दाखवली, विरारमध्ये राडा
Vinod Tawde: माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
माझी चूक झाली, सोडवा...; विनोद तावडेंचे 25 फोन; हितेंद्र ठाकूरांच्या दाव्यानं खळबळ, नालासोपारामध्ये राडा
Embed widget