Dasara : हिंगोलीत तब्बल 167 वर्षांचा इतिहास असलेला दसरा मेळावा, 51 फुटी रावणाचं केलं जाणार दहन
Hingoli Dasara : हिंगोलीच्या रामलीला मैदानावर हा उत्सव भरतो. अनेक जिल्ह्यातील ग्रामस्थ हा उत्सव पाहण्यासाठी येतात.

हिंगोली : भारतात म्हैसूरनंतर सर्वात मोठा दसरा हा महाराष्ट्रातील हिंगोली (Hingoli Dasara) जिल्ह्यात साजरा करणार येतो. 167 वर्षाची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवात तब्बल 51 फुटी रावणाचे दहन केले जाते. भव्य आतिषबाजीत दहन हे उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. कोरोना काळाचे दोन वर्षे वगळता आजतागायत येथे दसऱ्याची परंपरा सुरू आहे.
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर हा उत्सव भरतो. अनेक जिल्ह्यातील ग्रामस्थ हा उत्सव पाहण्यासाठी येतात. या वेळी कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आला आहे. महान संत खाकी बाबा यांच्या संकल्पनेतून हिंगोलीच्या या सार्वजनिक दसरा महोत्सवाला 164 वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली.
रामायण महाभारतामध्ये झालेले युद्ध रामकथा हुबेहूब या उत्सवात दाखविले जातात. त्यासाठी सार्वजनिक समिती तीर्थ क्षेत्र काशी विश्वनाथ येथून कलाकारांना आमंत्रित करतात. हे कलाकार राजा दशरथ, राम ,लक्ष्मण, रावण, शुर्पनखा (रावणाची बहीण) हनुमान यांची वेशभूषा करत कला सादर करतात.
या उत्सवावर संपूर्ण नियंत्रण हे प्रशासकीय विभागच असते. उपविभागीय अधिकारी समितीचे अध्यक्ष ते तहसीलदार हे सचिव असतात. या उत्सवात व्यावसायिकांकडून समितीला लाखो रुपये महसूल मिळतो. कुस्त्या, टेनिस अशा विविध खेळांचे आयोजन या ठिकाणी केलं जाते. तसेच अनेक क्रीडा स्पर्धाांचे आयोजन करण्यात येते. हिंगोलीचा सार्वजनिक दसरा म्हणजेच हिंगोलीकरांसाठी दिवाळीच आहे.
रामलीला मंडळाद्वारे दहा दिवस रामलीला कार्यक्रम व हनुमान मूर्ती, हत्ती- घोडे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर रावण व मेघनाथाच्या पुतळ्याचे दहन कार्यक्रम घेऊन रामलीला मैदानावर जत्रा भरु लागली, यालाच दसरा असे नाव पडले. दहा दिवस रामलीला पाहण्यासाठी येथे गर्दी सुरू आहे.
संबंधित बातम्या :
Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी पोलिसांचा विशेष प्लॅन; वर्षभरात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
