(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी, किश्तवाडमध्ये बर्फात अडकलेल्या 16 नागरिकांची भारतीय लष्कराने केली सुटका!
Jammu Kashmir : सततची बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानतेच्या परिस्थितीतही लष्कराची तुकडी NH 244वर पोहचण्यासाठी सुमारे 15KM चालली आणि संध्याकाळी 6:15च्या सुमारास सिंथन खिंडीजवळ नागरिकांपर्यंत पोहोचली.
Jammu Kashmir : भारतीय लष्कराने गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंथन पास येथे जोरदार हिमवृष्टीमुळे बर्फात अडकलेल्या 16 लोकांचे प्राण वाचवले. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजता नागरी प्रशासनाने लष्कराला सिंथन पासजवळ NH 244वर जोरदार हिमवृष्टीमुळे बर्फात अडकलेल्या 16 नागरिकांची माहिती दिली. ही बातमी मिळताच भारतीय लष्कराचे बचाव पथक सिंथन येथून घटनास्थळी रवाना झाले.
NH 244वर काही लोक अद्क्याची माहिती मिळताच लष्कराची तुकडी सुमारे 15 किमी चालत, सततच्या बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानतेच्या परिस्थितीचा समान करत, सिंथन खिंडीजवळ संध्याकाळी 6:15च्या सुमारास पोहोचली.
सततची बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानतेचा केला सामना!
सततची बर्फवृष्टी आणि शून्य दृश्यमानतेच्या परिस्थितीतही लष्कराची तुकडी NH 244वर पोहचण्यासाठी सुमारे 15KM चालली आणि संध्याकाळी 6:15च्या सुमारास सिंथन खिंडीजवळ नागरिकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर जवानांनी या नागरिकांना सिंथन मैदानात खाली आणले, जिथे त्यांना औषध, अन्न आणि राहण्यासाठी जागा देण्यात आली. या बचाव कार्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे बहुमोल जीव वाचले. या तत्पर कारवाईमुळे लष्कराचे कौतुक करण्यात येत आहे. तत्पूर्वी, अशाच एका कारवाईत, 18 जानेवारी रोजी कुपवाडा या सीमावर्ती जिल्ह्यात बर्फवृष्टीमुळे झालेल्या हिमस्खलनात वाहनांमध्ये अडकलेल्या सुमारे 30 नागरिकांचे प्राण लष्कराने वाचवले होते.
काश्मीरच्या अनेक भागात हलक्या पावसाने हजेरी लावल्यानंतर, उत्तरेकडील भागात देखील हवामान खराब झाले होते. श्रीनगरमध्ये 10.0 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. तर, अनेक भागात बर्फवृष्टी देखील होत आहे.
हेही वाचा :