एक्स्प्लोर

लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे.

जालना : दिवाळी संपल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाटेची भीती यामुळे आणखी वाढत आहे. या परिस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावलं जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहेत. अशाने कोरोनाचा धोना पुन्हा वाढला आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही इच्छा आहे. लॉकडाऊन नसला तरी शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

लग्नासाठी 200 जणांना दिलेल्या परवानगीबाबती पुर्नविचार करावा लागेल दिवाळीच्या दिवसात टेस्ट कमी केल्या होत्या. मात्र आता कोरोनाच्या टेस्टही वाढवण्यात आल्या आहे. अशारीतीने टेस्टिंग वाढल्यात म्हणजे कोरोनाबाधितांची संख्याही वाढेल. याचा अर्थ लाट वैगेरे येईल असा होत नाही. मात्र काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. गरज पडल्यास कठोर पावलं उचलावी लागतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. लग्न समारंभासाठी जी 200 जणांच्या उपस्थितीची परवानगी दिली होती त्याबाबत पुर्नविचार केला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट अनिवार्य

मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट किमान 4 दिवस आधी केलेली असावी, असंही त्यात नमुद करण्यात आलं आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य करण्यात आलं आहे. 72 तासापूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.

येत्या 8 ते 10 दिवसांत निर्णय घेणार : अजित पवार

बर्‍याच राज्यात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. संबंधित बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन, मंत्री उदय सामंतांची शिष्टाई फळाला, आंदोलन स्थगित, मंत्री शिववेंद्राराजे यांच्यासोबत होणार बैठक 
नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन, मंत्री उदय सामंतांची शिष्टाई फळाला, आंदोलन स्थगित, मंत्री शिववेंद्राराजे यांच्यासोबत होणार बैठक 
Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget