एक्स्प्लोर

ग्रामदेवता : सांगलीतील विटावासियांचं ग्रामदैवत श्रीभैरवनाथ

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी  असणाऱ्या ग्रामदैवतांची मोठी ख्याती आहे. काहींचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वीचा तर काहीचा शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. या ग्रामदेवतांनी श्रद्धेच्या माध्यमातून गावांना एकत्र बांधून ठेवलं आहे, तसंच लोकांना गुण्यागोविंदाने राहण्यास भाग पाडलं आहे. श्रीभैरवनाथ हे विटेकरांचे ग्रामदैवत... 125 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आजही तेवढ्याच दिमाखात उभं आहे. संपूर्ण सागवानी लाकडाच्या साहाय्यानं उभारलेलं कोरीव नक्षीकाम या मंदिरात पाहायला मिळते. शिसवच्या लाकडापासून हे कोरीव काम करण्यात आलं आहे. भैरवनाथाचा जन्मोत्सव चैत्र वद्य अष्टमी हा भैरवनाथ यात्रेचा मुख्य उत्सव आहे. अष्टमीदिवशी जन्मकाळ रुपात भैरवनाथाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. नवमीला विटा शहरात मोठा उत्सव भरतो. यावेळी शोभेचं मोठं दारुकाम आणि पालखी शर्यत आयोजित केली जाते. जवळपास चार पालख्या भैरवनाथाच्या मंदिरातुन निघतात. भैरवनाथाचा पालखी उत्सव नवरात्रोत्सवात भैरवनाथाची नऊ रुपात पूजा बांधण्यात येते. तर दसऱ्याला भैरवनाथाच्या पाच पालख्या निघतात. यात गायकवाड, शितोळे, पाटील आणि दोन सिद्धांच्या पालख्या निघतात. या दोन सिद्धांच्या पालख्यांची शर्यत असते. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक हजर असतात. हे या भैरवनाथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 125 वर्षांपूर्वी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी गावातील सर्व लोकांना एकत्र करुन मंदिराची उभारणी  केली आणि पालखी शर्यत सोहळ्याची परंपरा देखील सुरु केली. आज महाराष्ट्रभर ही शर्यत प्रसिद्ध झाली आहे. भैरवनाथ : हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक भैरवनाथ हे पांढरींच दैवत असून येथूनच पालख्याची सुरवात होते. ही ग्रामदेवता हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीकदेखील आहे. भैरवनाथाच्या पालख्या जवळच असलेल्या चावडी चौकात जातात. चावडी चौक म्हणजे मशीद. याठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात. नवसाला पावणारा देव भैरवनाथ आहे. नवनाथांपैकी एक हा भैरवनाथ असून या देवाकडे भाविक नवस करतात. भैरवनाथाचा इतिहास विटा जवळ असलेल्या  वासुबे येथे भैरवनाथाचे  मंदिर होते.  वासुबे येथील भैरवनाथ हा विटा येथे मुक्कामाला होता. कुलकर्णींकडे असलेले हे दैवत नंतर ग्रामरुपात प्रस्थापित झाले आणि हा पांढरीचा देव म्हणून ओळखला जाऊ लागला. नवसाला पावणारा देव म्हणून भैरवनाथला कौल लावला जातो. दर गुरुवारी नाथाला कौल मागून भाविक आपले मागणे मागतात. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
Raj Thackeray : भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे राज ठाकरेंना भेटताच निघून गेले
राज ठाकरेंच्या भेटीसाठी दीड तास थांबावं लागलं, सुवर्णपदक विजेता खेळाडू आणि प्रशिक्षकाचा संताप
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget