एक्स्प्लोर

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 37500 रुपये मदत जाहीर

शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत मदत जाहीर केली.

नागपूर : भात उत्पादक शेतकऱ्यांना 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 23 हजार 250 रुपये इतकी मदत मिळणार आहे. तर बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 37 हजार 500 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी, नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत मदत जाहीर केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा या अधिवेशनात चांगलाच गाजला होता. कोरडवाहू आणि बागायती भात पीक कोरडवाहू भात उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, तर पीक विम्यांतर्गत 1 हजार 170 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 7 हजार 970 रुपये मदत मिळेल. बागायत भात पीकास एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये तर पीक विम्यांतर्गत 1 हजार 170 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 14 हजार 670 रुपये मदत बागायत भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल. नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीका नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकेसाठी एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये, तर विम्यांतर्गत 9 हजार 750 रुपये मदत दिली जाईल. अशी एकूण 23 हजार 250 रुपये मदत नापेर क्षेत्रातील भात रोपवाटीकांना मिळणार आहे. भाताच्या नापेर क्षेत्रासाठी पीक विम्यांतर्गत 9 हजार 750 रुपये मदत देण्यात येईल. धानाला 200 रुपये प्रति क्विंटल बोनस दिला जाईल. हा बोनस 50 क्विंटलच्या मर्यादेत दिला जाईल, अशी घोषणाही फुंडकर यांनी केली. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी मदत कोरडवाहू कापूस उत्पादकांना शेंदरी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी एनडीआरएफमार्फत 6 हजार 800 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 30 हजार 800 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येईल. बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये, पीक विमा 8 हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी 16 हजार रुपयांची मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 37 हजार 500 रुपये इतकी प्रति हेक्टरी मदत बोंडअळीग्रस्त बागायती कापूस उत्पादक शेतकऱ्यास मिळणार आहे. कापसाची मदत ही 2 हेक्टरपर्यंत देण्यात येईल. फळ आणि भाजीपाला पीक ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही कृषीमंत्री फुंडकर यांनी मदत जाहीर केली. फळ पीकांसाठी एनडीआरएफमार्फत 18 हजार रुपये तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत 9 हजार ते 25 हजार रुपये इतकी मदत दिली जाईल. अशी एकूण साधारण 43 हजार रुपयांपर्यंतची मदत ओखी वादळाने नुकसान झालेल्या फळ पीकांसाठी दिली जाणार आहे. ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या भाजीपाल्याला एनडीआरएफमार्फत 13 हजार 500 रुपये मदत दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 
मनोज जरांगे पाटलांचा हॉस्पिटलमधूनच मोठा निर्णय, मराठा आरक्षणाच्या सर्व अभ्यासकांना अंतरवाली सराटीत बोलावलं, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget