एक्स्प्लोर
Advertisement
सरकार संपात फूट पाडतंय, एकी दाखवा : शरद पवार
मुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. शेतकर्यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संप यशस्वी करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची भूमिका आहे. स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50 टक्के देण्याबाबतही शेतकऱ्यांनी आग्रही राहावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
शेतकर्यांच्या भावना तीव्र आहेत. पण शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचं वाटप करावं आणि सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. संपकरी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तू रस्त्यावर फेकून आंदोलन केलं जात आहे. मात्र या वस्तू गरिबांना देऊन त्यांची गरज भागवावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
राज्यभरातील शेतकरी संपावर
राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.
पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.
त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.
संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.
- शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी.
नाशिकमध्ये शेतकरी संपादरम्यान हृदय हेलावणारं चित्र!
संप कायम, 5 जूनला महाराष्ट्र बंद, संपकरी शेतकरी आक्रमक
शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा दंग्याचा प्रयत्न: सदाभाऊ खोत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement