एक्स्प्लोर

ABP Majha Impact: दारू पिऊन वर्गातच झिंगलेल्या 'त्या' मद्यपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई, गेल्या महिन्यापासून होता गैरहजर

Gondia: घनश्याम मरस्कोल्हे हा शिक्षक गेल्या महिन्यापासून सातत्याने गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 

गोंदिया : मद्यप्राशन करून वर्ग खोलीतच लघुशंका करून तिथे ताणून झोपल्याचा घृणास्पद आणि संतापजनक प्रकार गुरुवारी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या निंबा येथील प्राथमिक शाळेत घडला होता. ही बातमी 'एबीपी माझा' वर सर्वप्रथम प्रसारित होताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली. आता या बातमीची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी मद्यपी सहायक शिक्षक घनश्याम मरस्कोल्हे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत (Gondia Teacher Viral Video) सदर मरस्कोल्हे हा शिक्षक 16 नोव्हेंबरपासून सातत्याने गैरहजर असल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.

Gondia Teacher Viral Video: झिंगलेला शिक्षक वर्गातच आडवा झाला 

गोंदिया येथील निंबा प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी हा प्रकार घडला होता.  घनश्याम मरस्कोल्हे या शिक्षकाने यथेच्छ मद्यप्राशन करून शाळेत प्रवेश केला.  त्यानंतर त्याने वर्गातच लघुशंका केली.  शिक्षकाने केलेल्या या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आणि त्यांनी हा प्रकार मुख्याद्यापक आणि पालकांच्या कानावर घातला. यावेळी हा झिंगलेला शिक्षक वर्गातच आडवा झाला होता.

या मद्यधुंद शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने याची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. आज त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

Gondia Teacher Viral Video: व्हिडीओ व्हायरल 

या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकांनी तर या घटनेचा व्हिडीओ काढला होता, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या शिक्षकाला दारूची नशा इतकी चढली होती, की आपल्‍या आजूबाजूला काय होत आहे याचं भानदेखील त्याला नव्‍हतं.

विद्येच्या मंदिरातच हे झिंगाट शिक्षक झोपले असल्‍याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलावलं. हा प्रकार पाहताच पालकांनाही धक्का बसला. पालकांनी यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.  नंतर शिक्षण विभागाने याची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले. 

ऑगस्ट महिन्यात असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातून समोर आला होता.  मेळघाटमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडrओ चांगलाच व्हायरल झाला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP MajhaLalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Embed widget