Viral Video : नवऱ्याला सोडून लग्नात नववधू दीरासोबत बेफाम नाचली, एका कोपऱ्यात बसलेल्या बिचाऱ्या नवऱ्याचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : असे म्हटले जाते की, सर्व नात्यांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते सर्वात खास असते. आता ही व्हिडीओ क्लिप तुम्हीच बघा, जिथे एक नववधू तिच्या नवऱ्याला सोडून दीरासोबत नाचताना दिसत आहे.

Viral Video : कोणत्याही लग्नात (Wedding) नाच-गाणे नसेल, तर त्या लग्नात मजा येत नाही. लग्नात केवळ कुटुंबीयच नाही तर नातेवाईक आणि मित्रमंडळींही आनंद लुटतात. अलीकडच्या काळात लग्नाचा असाच एक व्हिडीओही चर्चेत आहे. जिथे वहिनीने आपल्या दीरासोबत असा डान्स (Dance Viral Video) केला, जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. यादरम्यान, नवराही समोर उभा असलेला दिसतो. जो केवळ प्रेक्षक म्हणून दिसतो.
दीर आणि वहिनीचे नाते सर्वात खास
असे म्हटले जाते की, सर्व नात्यांमध्ये दीर आणि वहिनीचे नाते सर्वात खास असते. लग्नाचा प्रसंग आला की, दीर आपल्या भावजयीच्या लग्नात खूप धमाल करतात. आता ही व्हिडीओ क्लिप स्वतःच बघा. जिथे एक नववधू तिच्या नवऱ्याला सोडून दीरासोबत नाचताना दिसत आहे. दीर आणि वहिनीची जोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
दीर-वहिनीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नानंतर लगेचच वहिनी आपल्या दीरासोबत डान्स करताना दिसत आहे. हे पाहण्यासाठी अनेक पाहुणे उपस्थित होते. दोघेही एकमेकांसोबत बेफाम नाचताना दिसत आहेत. या दरम्यान, वहिनीच्या एनर्जीमध्ये कोणतीही कमतरता नसते किंवा दीरही हार मानायला तयार नसतो. परफॉर्मन्सदरम्यान दोघांची जोडी सारखीच दिसत आहे. किंबहुना दोघंही पटकन स्टेप्स कॉपी करत आहेत आणि तेही कसलाही सराव न करता..! मात्र दुसरीकडे नवऱ्याची अवस्था अशी आहे की, पाहुण्यांच्या शेजारी तो चक्क एक प्रेक्षक म्हणून उभं राहताना दिसतो.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
कपल_ऑफिशियल_पेज नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला 3700 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, 'वाह काय डान्स आहे.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'डान्स परफॉर्मन्स पाहून मागे असलेले लोकही आश्चर्यचकित झाले.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'हा व्हिडीओ खूप छान होता.'
महत्त्वाच्या बातम्या :























