एक्स्प्लोर

Nitin Gadkari : दीक्षांत समारंभातच गडकरींची कृषी विद्यापीठांवर टीका, निधीसाठी नेहमी केंद्र-राज्य सरकारवर का अवलंबून राहता, अशी विचारणा

शेतकऱ्याला अन्नदाता नव्हे तर उर्जादाता बनावे लागेल. कृषी विद्यापीठांना 'माइंडसेट' बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या आधारावर संशोधन व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूरः कृषी विद्यापीठांना कुठलीही गोष्ट सांगितली तर ते निधी नाही, अशी उत्तरे देतात. विविध वेतन आयोगांसाठी त्यांना केंद्र-राज्य सरकारकडून निधीची गरज पडते. दुसरीकडे तुमच्याकडे कृषी विभागाची हजारो एकर जमिन उपलब्ध आहे. त्यावर सिडबँक तयार करा, नर्सरी निर्माण करुन पैसे कमवून तुमचे खर्च भागवा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला. ते म्हणाले, विद्यापीठ जर कृषीच्या माध्यमातून पैसे उभारू शकत नाही तर शेतकरी कसा उभारणार, असा चिमटाही त्यांनी काढला.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भगत सिंह कोश्यारी,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  पुढे गडकरी म्हणाले, पारंपारीक पिकांद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आता शेतकऱ्याला अन्नदाता नव्हे तर उर्जादाता बनावे लागेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. कृषी विद्यापीठांना आपला 'माइंडसेट' बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या आधारावर संशोधन व्हावे. विदर्भातील शेतकऱ्यांना पिक घेताना येणाऱ्या समस्या, दर्जेदार रोपांची निर्मिती, कृषी उद्योगातून निर्यात वाढविणे आदींबाबत संशोधन करुन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची गरज असल्याचे यावेळी गडकरी म्हणाले.

विदर्भातून कापूस निर्यात करण्याचे माझे मानस असून येत्या काळात 17 देशात विदर्भाचा कापूस निर्यात करण्यात येईल. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे हे माझे ध्येर्य आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ मोठी भूमिका पार पाडू शकते. यासाठी विचारसारणीमध्ये बदल करुन देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी विद्यापीठांनी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी दिले.

आईने केला होता बँकेत नोकरीचा आग्रह

पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे बनू नका, नोकरी देणारे बना. मलाही माझ्या आईने बँकेत नोकरी करण्यासाठी आग्रह केला होता. मात्र मी व्यवसाय निवडला आणि कृषी क्षेत्रातील माझ्या प्रकल्पातून 15 हजार तरुणांना नोकरी उपलब्ध करुन दिली असल्याचे गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget