Naxalism : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची तिसऱ्यांदा धमकी, सरकारचे अजूनही सुरक्षेकडे दुर्लक्षच
राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी तिसऱ्यांदा धमकी देऊनही सुरक्षेत वाढ नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय.
![Naxalism : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची तिसऱ्यांदा धमकी, सरकारचे अजूनही सुरक्षेकडे दुर्लक्षच naxalites threaten dharmarao baba atram for third time government still ignores security Naxalism : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांची तिसऱ्यांदा धमकी, सरकारचे अजूनही सुरक्षेकडे दुर्लक्षच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/19/4bc68a962c7fe077a782f871570b8f87169514683749393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गडचिरोली : राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांना नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून (Surjagarh Mines) हिवाळी अधिवेशनात आणि त्यांनतर बनवल्या नंतर धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. आता पुन्हा एकदा नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील दुर्गम नक्षलग्रस्त गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मागील दोन वर्षांपासून सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. यासाठी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशा प्रकारची धमकी पत्रकातून देण्यात आली आहे. हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ आणि कंपनीत कार्यरत काही लोकांची देखील नावे आहेत. वर्षभरात आत्राम यांना तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली आहे.
दोन वेळा नक्षल्यानी धमकी देऊन ही सुरक्षेत वाढ नाही
धर्मरावबाबा आत्राम यांना हिवाळी अधिवेशनात देखील अशाप्रकारची धमकी मिळाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्राम यांची सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु उलट सुरक्षा कमी केल्याचे कळते. त्यामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम याना सद्यस्थितीत नक्षलग्रस्त जिल्ह्यात झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येते. मात्र इतर ठिकाणी त्यांना ' वाय प्लस' सुरक्षा देण्यात येते आहे. आत्राम यांना अधिवेशनात झेड प्लस सुरक्षा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होती. मात्र आत्राम हे शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तरी त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे हे नवलच आहे.
गडचिरोली जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाणार
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. कोनसरी येथे 20 हजार कोटींचा मोठा प्रकल्प उभा होत आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून येत्या काही काळात या कारखान्याचे उद्घाटन देखील होणार आहे. यातून जिल्ह्यातील हजारो युवकांनसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)