देशातील पहिले स्मार्ट इंटेलीजन व्हीलेज नागपुरात; शेतकऱ्यांना ई-मार्केट, AI तंत्रज्ञान आधारित शाळांसह डिजिटल सुविधांनी सुसज्ज असं गाव
Countrys First Smart Intelligence Village : देशातील पहिले स्मार्ट इंटेलीजन व्हीलेज म्हणून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गावाला तयार केले जात असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.

Countrys First Smart Intelligence Village : देशातील पहिले स्मार्ट इंटेलीजन व्हीलेज म्हणून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गावाला तयार केले जात असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण यासोबतच शेतीसाठी स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, मत्स्यव्यवसाय, बँक ऑन व्हिल, स्मार्ट निगराणी व्यवस्था आदी महत्वाच्या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी या गावाला सुसज्ज केल्या जात आहे. तर या सुविधांचा वापर करून गावातील नागरिकांचे जीवन सोईस्कर व्हावे आणि गावाचा आर्थिक विकास व्हावा, हा या पाठीमागचा उद्देश आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष ठेवला होता. त्यास तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्याचे ठरले. त्यानुसार सातनवरी गावाला स्मार्ट इंटेलिजन व्हिलेज म्हणून तयार करण्यावर काम सुरु झाले. हा पायलट प्रोजेक्ट असून हा यशस्वी झाला कि यानंतर इतर गावांना स्मार्ट इंटेलीजन व्हिलेज तयार करण्यावर प्रशासन विचार करेल. नुकतीच या स्मार्ट इंटेजिलन व्हिलेजची पाहणी जेव्हा नागपूरच्या विभागणीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केली.
नेमकं कसं असेल देशातील पहिले स्मार्ट इंटेलीजन व्हीलेज?
- संपूर्ण सातनवरी गावाला वायफाय नेटवर्कने जोडण्यात आले आहे.
- इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात मृदा परीक्षण सेन्सर लावण्यात आले, जा माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर शेतीतील जमिनी मध्ये असलेला ओलावा, खते व जीवनसतत्व याचे प्रमाण किती आहे हे कळेल. त्यानुसार पाणी व खते देणारी स्टिस्टम शेतकरी घरबसल्या ऑपरेट करू शकतात.
-गावातील फिश पौंडमध्ये सेन्सर लावण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण व माश्यांची ग्रोथ या बदल माहिती मिळते.
-गावातल्या आरोग्य केंद्रावरून नागरिक ऑनलाईन पद्धतीने शहरातील मोठ्या डॉक्टरांची अपॉईमेंट घेत उपचार घेणे शक्य झाले आहे.
-ऑनलाईन ट्रेडसाठी शेतकऱ्यांना ई-मार्केट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- ऑनलाईन बँकिंग सुविधांचा लाभ नागरिक घरबसल्या घेऊ शकतात.
-नैसर्गिक आपदा आल्यास आटो सायरन व आटो मेसेजिंग सिस्टीम गावात लावण्यात आली.
-गावातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेला एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सज्ज केले जात आहे.
-देशातील पहिले स्मार्ट इंटेलीजन व्हीलेज म्हणून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गावाला तयार केले जात असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.
हे देखील वाचा

























