Bihar Election Results: बिहार निवडणूक निकाल यायला लागू शकतो वेळ, काय आहेत कारणं?
Bihar Election :बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.कोरोनामुळं Bihar Election साठी मतगणना केंद्रांची संख्या यावेळी वाढवण्यात आली आहे. त्यामुळं अंतिम निकाल हाती यायला वेळ लागणार आहे.
Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जातील. नऊ वाजता पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण निकाल हाती यायला वेळ लागणार असण्याची शक्यता आहे. कारण कोरोनामुळं Bihar Election साठी मतगणना केंद्रांची संख्या यावेळी वाढवण्यात आली आहे.
मतगणना आठ वाजता सुरु होणार आहे. निकालाचा कल 9 वाजेपासून यायला सुरुवात होईल मात्र निकाल यायला वेळ लागू शकतो. कारण प्रत्येक विधानसक्षा क्षेत्रात औपचारिक रित्या 5 बूथवरील मतदान आणि व्हीव्हीपीटी चिठ्ठ्या तपासल्या जाणार आहेत. सोबतच कोरोना काळात झालेली भारततील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळं निवडणूक आयोगानं मतगणना केंद्रांची संख्या दीडपट वाढवली आहे. या सर्वांचा मेळ लावण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो.
Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?
Bihar निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये 71 विधानसभा जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 17 जिल्ह्यांतील 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यांत 15 जिल्ह्यांच्या 78 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यांतील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान सात नोव्हेंबर रोजी पार पडलं.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.
Bihar Election Results | नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहार निवडणुकीचा आज निकाल!
बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.
निवडणूक आयोगानं सांगितलं की, मतगणना सुरुळीत पार पडावी यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी सांगितलं की, मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या तिथं देखील विषेश सुरक्षा लावण्यात आली होती.
Bihar Election Results LIVE: बिहार निवडणुकीच्या निकालाचे प्रत्येक अपडेट, पाहा एका क्लिकवर