एक्स्प्लोर

नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली, 'या' नेत्यांवर जबाबदारी

खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान खडसे यांच्या वाढत्या हालचाली पाहून भाजपने त्यांची समजूत काढण्यासाठी एक नेता केंद्रातून तर एक नेता राज्यातून त्यांच्याकडे पाठवत समजूत घालण्यासाठी तयारी केली आहे.

मुंबई : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. खडसे यांची समजूत काढण्यासाठी दिल्लीतील नेते भुपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खडसेंच्या आजच्या दिल्लीतील शरद पवार भेटीनंतर अखेर भाजप पक्ष नेतृत्वाकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. खडसेंना पक्ष सोडण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या या दोन नेत्यांना पाचारण केले असल्याची माहिती आहे. खडसेंच्या नाराजीमुळे ओबीसी - बहुजन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने भाजपकडून यादव आणि तावडेंना खडसेंशी चर्चा करून वाद मिटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज खडसे यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी काल दिला होता. एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते मात्र, त्यांनी यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांशी भेटीमध्ये मतदारसंघातील सिंचन योजनांवर चर्चा केली. या योजनांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी पवारांची भेट घेतली असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी पवारांनी मतदारसंघातील पराभवाबाबत विचारले असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर
दरम्यान, उद्या खडसे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. अशी माहिती खुद्द खडसे यांनीच दिली आहे. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान खडसे यांच्या वाढत्या हालचाली पाहून भाजपने त्यांची समजूत काढण्यासाठी एक नेता केंद्रातून तर एक नेता राज्यातून त्यांच्याकडे पाठवत समजूत घालण्यासाठी तयारी केली आहे. आजवर राजकीय करिअरमध्ये अनेक पक्षांनी मला अनेक वेळा त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. मला वेगवेगळी पदं देण्याच्या ऑफर देखील दिल्या गेल्या. मात्र मी पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. पक्ष वाढवला आणि विस्तार केला. मात्र आता पक्षातून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कारण नसताना आरोप केला जात असेल, हेतुपुरस्पर मला टाळलं जात आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तरीही मला क्लीन चिट दिली गेली नाही, असे खडसे यांनी पवार यांना भेटायला जाण्याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते. Eknath Khadse | पवारांनंतर खडसे ठाकरेंना भेटणार, खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश? ABP Majha मागच्याच आठवड्यात खडसे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले आहेत. बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय असे म्हटले होते. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे देखील खडसे यांनी सांगितलं होतं. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करुन कुणी दोषी आढळले तर कारवाई करण्याचे आश्वासन खडसेंना दिले होते. Eknath Khadse | मी काय गुन्हा केला? ते अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे     हे ही वाचा -   भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या? 
विनोद तावडे एकनाथ खडसेंच्या भेटीला, भाजपमधील नाराजी नाट्यावर खडसेंची प्रतिक्रिया 
बहुमत नसताना फडणवीसांनी शपथ घ्यायला नको होती : एकनाथ खडसे 
सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे केव्हाच रद्दीत विकले : एकनाथ खडसे
 

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget