मंत्र्याला अंधारात ठेऊन सचिव स्तरावरुन एमपीएससीला सूचना, चौकशी करण्याचे वडेट्टीवार यांचे आदेश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरणानंतर आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी खुलासा केला आहे.मात्र, हा खुलासा करताना त्यांनी आधी केलेले ट्वीट डिलीट करत नवीन ट्विट केलं.

मुंबई : आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पत्रानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवर अडचणीत आल्याचे पहायला मिळाले. माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. तत्पूर्वी, माझ्या खात्याकडून कसलीही सूचना एमपीएससीला केली नसल्याचा खुलासा मंत्री वडेट्टीवार यांनी ट्वीटरवरुन केला होता. पण, लगेच ते ट्वीट डिलीट करत नव्याने हे ट्विट करण्यात आलाय. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पष्टीकरण
आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवलं त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

अन् वडेट्टीवार यांनी ट्वीट डिलीट केलं
एमपीएससीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर एबीपी माझाने बातमी दिली होती. याच बातमीचा स्क्रिन शॉट ट्वीटर वर शेअर करत आपल्या अखत्यारीतील आपत्ती व्यवस्थापन विभागाने एसपीएससीला कसलीही सूचना केली नसल्याचा खुलासा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. याचवेळी वृत्त्त वाहिन्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी विरोधी पक्षाद्वारे पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवून बातमी देऊ नये किंवा तपासणी करून बातमी द्यावी, असं मंत्री वडेट्टीवार यांनी लिहलं होतं. मात्र, एमपीएससीच्या पत्रातचं उल्लेख असल्याने वडेट्टीवार यांनी ते ट्विट डिलीट केलं.
मला अंधारात ठेऊन निर्णय : वडेट्टीवार
आधीचे ट्वीट डिलीट केल्यानंतर वडेट्टीवार पुन्हा एकदा ट्विट डिलीट करत "माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews pic.twitter.com/fdeaHtSxcG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
एमपीएससीकडून खुलासा
मंत्री वडेट्टीवार यांच्या ट्विटनंतर एमपीएससीकडून सुद्धा हेच संगितले आहे की हा निर्णय सचिव स्तरावर आणि मुख्यमंत्री यांच्या परवानगीने झाला आहे. यासाठी त्या विभागाच्या मंत्र्याशी बोलणे झाले किंवा त्यांना अशी कल्पना आहे की नाही याबाबत माहिती नाही. त्यामुळे परिपत्रकात त्या विभागाचे नवा नमूद केले गेले आहे.
निर्णयाचा फेरविचार करा : मंत्री विजय वडेट्टीवार
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे स्वतः कोविड पॉझिटिव्ह असून ब्रिच कॅण्डी रुग्णालय मुंबई येथे उपचाराकरिता गेल्या पाच दिवसापासून भरती आहेत. पुणे येथे विधार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः व्हिडीओव्दारे माहिती दिली.
राज्य सरकारने MPSC परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे .
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021 ]
राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये. (1/2) #MPSC #mpscexam @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews #Maharashtra pic.twitter.com/DtRvT3V684
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविडची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेताला आहे. या राज्याचा मंत्री जरी असलो तरी कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांची मुले मोठ्या प्रमाणात परीक्षा देत असल्याने त्यांचे आईवडील घाम गाळून मुलांना अधिकारी होण्याचे स्वप्न बघत आहे, त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करून यावर तोडगा काढून मार्ग काढावा, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या, तसेच विरोधी पक्षांनी यावर तेल घालून राजकारण करू नये, आपल्या सर्वांच्या मुलांच्या भविष्याचा विषय आहे, यावर सर्वजण मिळून तोडगा काढूया, अशी कळकळीची विनंती केली आहे.























