एक्स्प्लोर

धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणी संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र; म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक खातं बरखास्त करून अर्जुन खोतकरांना महाराष्ट्र भूषण द्या!

Sanjay Raut : धुळे विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी 85 लाख रकमेबाबतच्या तपशिला संदर्भात दिरंगाई होत असल्याचं सांगत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे

Sanjay Raut मुंबई : धुळे विश्रामगृहात सापडलेल्या (Dhule Govt Rest House Cash Case) एक कोटी 85 लाख रकमेबाबतच्या तपशिला संदर्भात दिरंगाई होत असल्याचं सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांना पत्र लिहले आहे. धुळे शासकीय विश्रामगृहात 21 मेच्या रात्री एक कोटी 85 लाखांचे घबाड सापडलं, यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र हे पैसे कुणाचे आणि तेथे कुणी आणले या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्‍यांना जाब विचारला आहे. सोबतच या प्रकरणात सर्वच पातळीवर  सुरुवातीपासून दडपण्याचा, भ्रष्टाचारांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ही संजय राऊत यांनी केला आहे.  

या सगळ्या प्रकरणात एसआयटी स्थापन करू, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या सगळ्या प्रकरणात साधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले, असे ही संजय राऊत यांनी या पत्रात म्हटलंय. धुळे खंडणीप्रकरणी तपास योग्य दिशेने झाला नाही तर या प्रकरणात इतर स्फोट नाईलाजाने करावे लागतील, असा इशारा ही संजय राऊत यांनी या पत्रात दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

संजय राऊत यांच्या पत्राचा नेमका आशय काय? 

भ्रष्टाचारी तुरुंगात जातील, एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार, नाही असे आपण अधूनमधून सांगत असता. मात्र गेल्या काही वर्षांत आपण भाजपचे डम्पिंग ग्राऊंड करून भ्रष्टाचारात बरबटलेला सर्व कचरा स्वपक्षात सामील करून घेतला व त्यांचे समर्थनही आपण करता. त्यामुळे खरे फडणवीस नक्की कोणते असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावणारे एक प्रकरण धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात घडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात 21 मेच्या मध्यरात्री विश्रामगृहाच्या खोली क्र.102 मध्ये 1 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले. या खोलीतून 3 कोटी रुपये आधीच बाहेर नेले व 10 कोटी जालन्यात पोहोचवले. धुळे दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या 'पीए'च्या खोलीत ही रक्कम होती व धुळ्यातील ठेकेदारांकडून अंदाज समितीच्या अध्यक्षांना 'नजराणा' देण्यासाठी खंडणीरूपाने 15 कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे देशभरात खळबळ उडाली.
 
सुरुवातीपासून हे प्रकरण सर्वच पातळीवर दडपण्याचा व भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. जनक्षोभ वाढला तेव्हा या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 'एसआयटी' स्थापन करण्याची वरपांगी घोषणा आपण केली. त्या एसआयटीचे पुढे काय झाले? त्याचे प्रमुख कोण? सदस्य कोण? हे समजले नाही. त्यामुळे एसआयटीची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. आता असे समोर आले की, 'एसआयटी' राहिली बाजूला, खंडणीरूपाने जमा केलेल्या या रकमेबाबत एक साधा 'अदखलपात्र' गुन्हा दाखल करण्यात आला व प्रकरण दडपण्यात आले. ही बाब लाजिरवाणी व आपण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किती गंभीर आहात हे दर्शविणारी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देण्याचाच हा प्रकार आहे. असेही संजय राऊत या पत्रात म्हणाले आहे. 

..तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करा 

आपल्या राज्यात हे असेच चालणार असेल तर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खाते बरखास्त करून मोकळे व्हा व भ्रष्ट अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना 'महाराष्ट्र भूषण' व त्यांचे 'पीए' किशोर पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करा असे मी आपणास सुचवीत आहे. असेही ते म्हणाले. 

प्रिय देवेंद्रजी, धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाला तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. विश्रामगृहावर सापडलेले घबाड हे अंदाज समिती अध्यक्षांना 'नजराणा' देण्यासाठीच गोळा केले. माझ्या माहितीप्रमाणे धुळे शहरातील व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून अंदाज समिती अध्यक्षांना देण्यासाठी ही रक्कम गोळा केली. त्या पिशवीवर 'R' लिहिले होते. धुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने तोंडी आदेश देऊन शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी 10,000  प्रमाणे 1 कोटी 47 लाख रुपये गोळा केले. ही रक्कम फक्त तीन तासांत गोळा केली. पैसे जमा झाले नाहीत तर 'समिती'चे सदस्य दुकानांवर रेड टाकतील, असे निरोप देण्यात आले व त्यानंतर पैसे जमा केले.

याबाबतची अधिक माहिती हवी असेल तर ती मिळू शकेल. आपल्या राज्यातला भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे व आपण फक्त राजकीय मसलती व उद्योग-व्यापारात गुंतून पडला आहात. धुळे खंडणी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर स्फोट नाइलाजाने करावे लागतील. तूर्त तरी अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना महाराष्ट्र भूषण व त्यांच्या पीएंना 'पद्मश्री'ने सन्मानित करून राज्यातील भ्रष्टाचाऱ्यांचा बहुमान करावा असे मी आपणास सुचवीत आहे.असेही संजय राऊत या पत्रात म्हणाले आहे. 

हे ही वाचा 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget