एक्स्प्लोर

Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा; खास पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सिनेमाच्या टीमचं अभिनंदन

Eknath Shinde : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा महाराष्ट्राचा फेव्हरेट ठरला आहे.

Eknath Shinde On Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यासोबत पुरस्कार सोहळ्यांमध्येदेखील बाजी मारली आहे. झी स्टुडिओचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' (Maharashtracha Favourite Kon) हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील (CM Eknath Shinde) एक खास पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाने विविध विभागातील पुरस्कार पटकावले आहेत. सर्व पुरस्कार विजेते कलाकार, तंत्रज्ञ तसेच निर्माते मंगेश देसाई यांचे मनापासून अभिनंदन... हार्दिक शुभेच्छा". 

View this post on Instagram
 
A post shared by Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde)

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' पुस्कार सोहळ्यात 'Dharmaveer'चा बोलबोला!

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्यात 'धर्मवीर' हा सिनेमा महाराष्ट्राचा फेव्हेरेट ठरला आहे. 'धर्मवीर' महाराष्ट्राचा फेव्हेरेट ठरण्यासोबत या सिनेमाला आणखी चार पुरस्कारदेखील मिळाले आहेत. फेवरेट अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) ठरला आहे. तर फेवरेट दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) ठरले आहेत. महाराष्ट्राचा फेवरेट गायक आदर्श शिंदे (Adarsh Shinde) ठरला आहे. तर फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार स्नेहल तरडेला (Snehal Tarde) मिळाला आहे. 

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा 13 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली होती. प्रवीण तरडे यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन आणि दमदार लेखन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. 

'धर्मवीर 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Dharmaveer 2 Coming Soon)

'धर्मवीर' या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सिनेप्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागात आनंद दिघे यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा (Dharmaveer 2) केली होती. त्यामुळे चाहत्यांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे. 

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आनंद दिघे यांच्या अनेक गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत. त्यांच्या या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून 'धर्मवीर 2' प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा घाट मंगेश देसाईने (Mangesh Desai) घातला आहे. 

संबंधित बातम्या

Dharmaveer 2 : धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार? मंगेश देसाईंनी केली 'धर्मवीर 2'ची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
Sanjog Waghere on Maval Loksabha : संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vision Sunil Tatkare  Uncut: पंतप्रधान मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतंVishwajeet Kadam Majha Vision : सांगलीतील उमेदवारीची इनसाईड स्टोरी,विश्वजीत कदमांची Exclusive मुलाखतHemadpanti Temple Pandharpur : उजनीच्या उदरात दडलेला हेमाडपंती मंदिराचा ठेवा Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
भाजप प्रवेशाच्या आरोपांवर विश्वजीत कदमांचे सुटसुटीत उत्तर, म्हणाले...
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
'नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार', PM मोदींची ठाकरे-पवारांवर जोरदार टीका
Sanjog Waghere on Maval Loksabha : संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
संजोग वाघेरेंचा मावळ लोकसभेला विजयाचा दावा; म्हणाले, श्रीरंग बारणेंना फक्त 'इथून' लीड मिळेल!
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
RCB Playoff : दिल्लीच्या विजयाचा फायदा आरसीबीला, पाहा प्लेऑफचं गणित  
Mumbai Metro : मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो, जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद, अचानक निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होणार
मोदींचा घाटकोपरमध्ये रोड शो, जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद, अचानक निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होणार
Ghatkopar News: होर्डिंगचा ढिगारा उपसला, 18 बाईक अन् 7 कार बाहेर निघाल्या; ढिगाऱ्याखाली आणखी 30-40  जण?
घाटकोपरमधील होर्डिंगचा ढिगारा उपसला, 18 बाईक अन् 7 कार बाहेर निघाल्या; ढिगाऱ्याखाली आणखी 30-40 जण?
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी- चिंचवड गोळीबाराने हादरले; व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या
पिंपरी- चिंचवड गोळीबाराने हादरले; व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या
मालेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
मालेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Embed widget