एक्स्प्लोर

बहीण पंकजा मुंडेंनी शुभेच्छा दिल्याचा आनंद, धनंजय मुंडेंकडून 'टोमणा' मारत शुभेच्छांचा स्वीकार

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथे टोमणा मारत शुभेच्छांचा स्वीकार केला.

पुणे : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या. यावर सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय असं सांगत पवित्र गहिनीनाथ गडावरुन मला शुभेच्छा देण्याची त्यांना सद्बुद्धी मिळाली याचा आनंद आहे, असा टोला देखील लगावला. धनंजय मुंडे म्हणाले की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या विरोधी उमेदवार पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या काही शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही त्या मला ऐकायला मिळाल्या नाहीत. पण मी माध्यमांकडून सोशल मीडियाकडून जे काही ऐकलं पाहिलं. त्यातून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मनापासून शुभेच्छा दिल्याचा आनंद आहे. वामनभाऊच्या वास्तव्य आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गहिणीनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. त्या शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्याच्या प्रेरणा देत राहील.  मी धन्यवाद देखील मानले आहेत. त्या शुभेच्छा जनसेवेच्या सत्कार्यासाठी मी कामी पाडेन एवढं निश्चित आहे, असं मुंडे म्हणाले. पवार नसते तर धनंजय मुंडे कुठंच नसते मराठवाड्यातील नागरिकांसाठी धंनजय मुंडे यांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड येथील रावेत येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. पाच वर्षांपूर्वी मला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांनी दिली नसती तर आज हा भाऊ तुम्हाला कुठंच दिसला नसता. 2014 साली मला कोणी चांगलं बोलत नव्हतं. गद्दार, घरफोड्या, पाटीत खंजीर खुपसला, धन्या, माझी लायकी, शिव्यांच्या राखोळ्या, खलनायक म्हणायचे. पण जसजसे लोक काम पहायला लागले. धन्याचा धनंजय झाला. धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊंचा मंत्री झालो. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या मागे असते. हे मी पाहिलं. गेली सात वर्षे मी काय नाही पाहिलं. सर्व सहन केलं, दुःख कधीच व्यक्त नाही केलं. समाजसेवेचा वसा अण्णा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंकडून घेतला जो अजून सोडला नाही, असे मुंडे म्हणाले. संबंधित बातम्या 'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात  बजाज पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश  कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर  बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Embed widget