एक्स्प्लोर

Mulshi Pattern 2 : आराराssss खतरनाक..; प्रवीण तरडेंकडून मुळशी पॅटर्न 2 सिनेमाची घोषणा, कशावर आधारीत असणार सिनेमा? सांगून टाकलं

Pravin Tarde announces Mulshi Pattern Part 2: 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर 'मुळशी पॅटर्न 2'ची घोषणा, टायटलही सांगितलं.

Mulshi Pattern Part 2: मराठी सिनेसृष्टीत सध्या 'राजा शिवाजी'नंतर (Raja Shivaji) 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे सिनेमागृहात 'देऊळ बंद 2' ला प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद. 'देऊळ बंद'ला प्रेक्षकांचा (Entertainment) जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 11 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमानं जबरदस्त बॉक्स ऑफिस (Box Office Collection) कलेक्शन केलं होतं. दरम्यान, 'देऊळ बंद 2'ला हा प्रेक्षकांनी पाठिंबा दिला आहे.  'देऊळ बंद 2' सिनेमागृहात धुमाकूळ घालत असताना आता प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांना खास सरप्राईज दिलं आहे.  त्यांनी सुपरहिट 'मुळशी पॅटर्न'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांनाही आनंद झाला आहे. 

'देऊळ बंद 2' नंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा (Pravin Tarde Officially Announces Mulshi Pattern 2)

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या सिनेमाला चाहत्यांचा पाठिंबा आहे.   हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची हाऊसफूल्ल गर्दी जमतेय. दरम्यान, 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी 'मुळशी पॅटर्न'च्या दुसऱ्या भागाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.  'मुळशी पॅटर्न 2' हा सिनेमा इतका खतरनाक असेल की, तुमच्या अंगावर काटा येईल', असे प्रवीण तरडे म्हणाले. 

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले, 'देऊळ बंद 2 नंतर शक्यतो मी मुळशी पॅटर्न पार्ट 2कडे मी वळेन.    मुळशी पॅटर्न पार्ट 1 या सिनेमातून मी शेती विकायची नसते, राखायची असते असं सांगितलं होतं.  मुळशी पार्ट 2 मधून, तुझ्या माझ्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर मुळशी पॅटर्न 2 या सिनेमातून मिळणार', असं प्रवीण तरडे म्हणाले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

प्रवीण तरडेंनी आगामी सिनेमाचं टायटलही सांगितलं (Pravin Tarde Set To Return With Mulshi Pattern 2)

'सिनेमाचं नावच आहे, मुळशी पॅटर्न पार्ट 2 - तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट.. हा सिनेमा इतका खतरनाक असेल, इतका जबरदस्त असेल.. की अंगावर  काटे आणि शहारे येईल', असं प्रवीण तरडे म्हणाले. 'देऊळ बंद 2 या सिनेमाची पब्लिसीटी झाली की, मीटिंग करायची आहे..लवकर सुरू करायचं आहे..', असंही प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडेंनी दिलेल्या हिंटनंतर प्रेक्षकांनी 'देऊळ बंद 2' सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.  हा सिनेमा वाळूमाफियांवर आधारीत असेल का?  असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 3'चा ताबा, सस्पेन्स थ्रिलर सिनेमानं 9 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं?

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
Shiv Sena Symbol Case : शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला
शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला, राहुल नार्वेकरांनाही आरसा दाखवला
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget