एक्स्प्लोर

पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविमा भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता.

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही बिगर कर्जदार शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविम्यासाठी अर्ज भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त पीकविम्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. यावेळी कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. पीकविमा योजनेला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली असली, तरीही त्याला केंद्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारनं आज 5 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ फक्त पीकविम्याच्या अर्जासाठी आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची दोन आठवड्यांमध्ये छाननी केली जाईल. अर्जांची छाननी झाल्यानंतरच पीकविम्याचा हफ्ता शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. अर्जांची छाननी आणि पीकविम्याच्या भरण्यानंतर शेतकरी पीकविम्यासाठी पात्र असेल. पीकविम्यासाठी दोनवेळा मुदतवाढ 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पीकविमा भरणं शक्य झाला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आज 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना गेल्या चार दिवसात अर्ज भरता आलेले नाहीत. खालील अटी आणि शर्तींवर आज पीकविमा भरता येणार आहे. पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा सर्व्हर डाऊन, शेतकऱ्यांना मनस्ताप पीक विमा भरण्याची काल 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती, मात्र पीकविम्याची वेबसाईट डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पीकविम्यासाठी सरकारनं 31 जुलै ही मुदत दिली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला अर्ज या मुदतीत दाखल करता आला नाही, त्यामुळे केंद्राकडे विनंती करत 4 ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. आता आजही शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पीकविमा भरण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर असेल. याआधी म्हणजे 31 जुलै 2017 रोजी सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढवली होती. मात्र, 1 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित शासन निर्णय सरकारने जारी केला आणि 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढवल्याचे जाहीर केलं. बिगर कर्जदार शेतकरी आज 4 ऑगस्टपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने पीक विम्याच्या पोर्टलवर अर्ज भरु शकतील किंवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जही स्वीकारले जातील. याचसोबत शेतकऱ्यांकडे 31 जुलै किंवा त्यापूर्वीचं पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, बँका शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारू शकणार नाहीत. सरकारच्या जनसुविधा केंद्रांवर अर्ज स्वीकारले जातील. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा नियमित प्रक्रियेनुसार भरला जातो. याआधी पीक विम्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2017 ही होती. मात्र, बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या, त्याशिवाय ऑफलाईन-ऑनलाईनच्या घोळामुळे आणखीच अडथळे निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली होती. संबंधित बातमी : पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

महत्त्वाच्या बातम्या

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा राजीनामा, सचिवांकडून पुढील प्रक्रियेला सुरुवात, तक्रारींची चौकशी सुरु झाल्याची माहिती 
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी
लातूरच्या जवळगा साकोळ यात्रेत भीषण अपघात, आकाश पाळण्यात केस अडकून 15 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget